PM Narendra Modi in Sansad : सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त संसदेच्या सभागृहात चर्चा सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेत सहभाग घेत संविधानावर भाष्य केलं. मात्र, यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी गेल्या ७५ वर्षांतील महत्वाच्या काही घटनांचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आणीबाणीसह आदी मुद्यांवरून मोदींनी टीका केली. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा अहंकारी असा उल्लेखही केला. मोदींनी म्हटंल की, “एका अहंकारी व्यक्तीने मंत्रिमंडळाचा निर्णय फाडला होता आणि त्यानंतर मंत्रिमंडळाने देखील तो निर्णय बदलला”, असं म्हणत काँग्रेसने सातत्याने संविधानाचा अवमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “संसदेत न येता, संसदेलाच अस्वीकार केलं गेलं. भारतीय राज्यघटनेचा पहिला पुत्र कोण असेल तर ती संसद आहे. मात्र, संसदेचाही गळा घोटण्याचं काम काँग्रेसने केलं. ३५ ए देशावर लादलं गेलं. मात्र, ३५ ए जर नसतं तर जम्मू-काश्मीरमध्ये जी हालत झाली होती, ती हालत झाली नसती. राष्ट्रपतींच्या आदेशावर जे काम केलं गेलं आणि देशाच्या संसदेला अंधारात ठेवण्याचं काम झालं. संसदेचा अधिकार असतो. कोणीही मनमाणी करू शकत नाही. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे (काँग्रेस) बहुमत होतं ते देखील करू शकले असते. पण तसं केलं नाही. कारण काँग्रेसच्या मनात पाप होतं”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.
हेही वाचा : नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित नेहरूंचं ‘ते’ विधान वाचून दाखवलं; इंदिरा गांधींवरही टीकास्र!
u
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सर्वांना सन्मान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील काँग्रेसच्या मनात कटुता होती. जेव्हा अटलजींचं सरकार होतं, तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्मान जी भूमी आहे, त्या ठिकाणी स्मारक बनवण्याचं ठरलं. मात्र, दुर्भाग्य आहे की १० वर्ष यूपीएचं सरकार असताना हे काम होऊ दिलं नाही. मात्र, जेव्हा आमच्या पक्षाचं सरकार आलं तेव्हा ते काम पूर्ण केलं. स्वत:ची खूर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर टीका
“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, मला हे मान्य करावं लागेल की पक्षाध्यक्ष हे सत्तेचे केंद्र आहे आणि सरकार पक्षाला उत्तरदायी आहे. इतिहासात पहिल्यांदाच संविधानाला एवढा मोठा धक्का बसला. राष्ट्रीय सल्लागार परिषदेला पंतप्रधानापेक्षा वरचं स्थान सोनिया गांधींना देण्यात आलं होतं.” दरम्यान, राहुल गांधींवर बोलताना मोदींनी त्यांचा उल्लेख अहंकारी असा केला. मोदी म्हणाले की, “एका अहंकारी व्यक्तीने मंत्रिमंडळाचा निर्णय फाडला आणि त्यानंतर मंत्रिमंडळाने देखील निर्णय बदलला. ही कसली व्यवस्था आहे? जेव्हा एखाद्या अहंकारी व्यक्तीने मंत्रिमंडळाचा निर्णय फाडला आणि मंत्रिमंडळाचा निर्णय बदलला”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला.