नुकतेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या तिन्ही राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी दिग्गज नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे.

‘जागरण’ या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या देशाचं दुर्दैव आहे की, जे लोक आपल्या भाषणातून बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्वातून समाजजीवनावर प्रभाव पाडतात, त्यांच्यातील एक मोठा वर्ग जुन्या आणि बंदिस्त मानसिकतेत अडकला आहे. हे फक्त राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. ही प्रवृत्ती सार्वत्रिक जीवनात सगळीकडे आपल्याला त्रास देत असते.”

Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

हेही वाचा : “गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल”, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात पंतप्रधानांचे वक्तव्य, म्हणाले…

“माध्यमांचं लक्ष काही कुटुंबावरच अधिक राहिलं”

“जसे कुठल्याही क्षेत्रात एखादं नाव मोठं झालं, कुणीतरी आपली जाहिरात केली तर बाकीच्या लोकांवर लक्ष जात नाही. मग, तो व्यक्ती कितीही प्रभावशाली असो किंवा चांगलं काम करत असू. तेच, राजकीय क्षेत्रातही होत असतं. दुर्दैवाने अनेक दशकांपासून माध्यमांचं लक्ष काही कुटुंबावरच अधिक राहिलं आहे,” असं मोदींनी सांगितलं.

हेही वाचा : संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “याच्यापाठी कोण…”

“भाजपा हा केडर आधारित राजकीय पक्ष आहे”

“त्यामुळे नवीन लोकांच्या उपयुक्तेबाबत चर्चा होत नाही. म्हणून कधी-कधी काही लोक तुम्हाला नवीन वाटतात. पण, ही लोक नवीन नसतात, हेच सत्य आहे. त्यांच्याकडे मोठा अनुभव असतो. भाजपा हा केडर आधारित राजकीय पक्ष आहे. संघटनेत काम करताना कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी त्याच्यातील कार्यकर्ता नेहमी जिवंत असते,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.