पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. वायुसेनेच्या विमानानं ते नुकतेच पुणे विमानतळावर आले असून थोड्याच वेळात ते देहूत दाखल होणार आहेत. याठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मोदींची सभा देखील होणार आहे. या सभेला वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना व्हीआयपी पास देण्यात आला आहे. संबंधित पास असणाऱ्या नागरिकांनाच सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे.

पण सभास्थळी येणाऱ्या नागरिकांनी काळ्या रंगाची कोणतीही गोष्ट परिधान केली असेल तर त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. काटेकोर तपासणी केल्यानंतरच त्यांना सभास्थळी प्रवेश देण्यात येत आहे. मोदींच्या प्रत्येक सभेत जसे काळे कपडे वर्ज असतात तसे आजच्या सभेत देखील काळे कपडे, मास्क, कुठल्याही प्रकारचे काळे कपडे गेटवरच काढून घेण्यात येत आहे. नागरिकांना चावी, पाण्याची बाटली, कुठल्याही प्रकारची पिशवी देखील घेऊन जाण्यास मनाई आहे.

Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी पुण्यातील एमआयटी येथे आले होते. त्यावेळीही काळे कपडे परिधान करून येणाऱ्या नागरिकांना सभास्थळी प्रवेश नाकारला जात होता. तेव्हा शर्ट, बनियान, टोपी, मोजे, पाकिटं बाहेर काढून ठेवावे लागत होते. संबंधित काळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करत नागरिक निषेध व्यक्त करू शकतात, त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी काळा रंग वर्ज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी हेही यावेळी उपस्थित होते.