पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करतात. यंदाची दिवाळी ते जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय सैनिकांबरोबर साजरी करणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी हे कारगिलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘सबका साथ, सबका विकास’ची प्रेरणा प्रभू रामचंद्रांकडून : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंत्रप्रधान झाल्यापासून दरवर्षी सीमेवरील भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सियाचीनमध्ये सैनिकांसोबत पहिली दिवाळी साजरी केली होती. तर २०१५ साली त्यांनी पंजाबमध्ये, २०१६ साली हिमाचलच्या किन्नौरमध्ये, २०१७ साली जम्मू-काश्मीर, २०१८ साली उत्तराखंड, २०१९ मध्ये राजौरी, २०२० मध्ये लोंगेवाला पोस्ट तर गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांबरोर दिवाळी साजरी केली होती. हीच परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi reached at kargil to celebrate diwali with indian army spb