PM Narendra Modi Reaction on Manmohan Singh demise: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात आज (दि. २६ डिसेंबर) निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सायंकाळी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.”

Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Two children aged 2 and 17 died accidentally in separate incidents in Badlapur Kalyan East
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
GBS , Victim of GBS disease, Solapur, GBS disease ,
सोलापुरात जीबीएस आजाराचा संशयित मृत्यू

हे वाचा >> मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिले, “डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती…”

हे वाचा >> Manmohan Singh : विराट, उपवास अन् पंतप्रधान मनमोहन सिंग…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशभरातील सर्वच नेत्यांनी एक्सद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Story img Loader