नवी दिल्ली : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आचरणात आणत असलेल्या धार्मिक अनुष्ठानाचा एक भाग म्हणून ११ दिवस घोंगडीवर झोपत असून नारळपाण्याचे प्राशन करत आहे, अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> काँग्रेसचा एकत्र निवडणुकांना विरोध; ‘एक देश, एक निवडणूक’ समिती बरखास्त करण्याची खरगे यांची मागणी

पंतप्रधान ‘गायपूजा’ आणि गोसेवा करत आहेत. याशिवाय ते अन्न आणि इतर गोष्टीही दान करत आहेत. धर्मग्रंथानुसार कपडेही दानही करत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. रामभक्त मोदींनी गेल्या काही दिवसांत नाशिकमधील रामकुंड आणि श्री काळाराम मंदिर, आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर आणि केरळमधील तिरुप्रयार श्रीलंकेला भेट दिली आहे. येत्या दोन दिवसांत ते तामिळनाडूतील आणखी मंदिरांना भेट देणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत मंदिरांना भेट देणे आणि अनेक भाषांमध्ये रामायण ऐकणे आणि मंदिरांमधील भजनात भाग घेणे हे पंतप्रधानांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे कारण ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या त्यांच्या दृष्टिकोनानुसार ‘भारतीय’ या संकल्पनेची सामाजिक-सांस्कृतिक जडणघडण मजबूत करणे हे त्यांचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.