उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपा नेते तथा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या विजयाच्या जल्लोष सुरु असतानाच दुसरीकडे गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचा हा दौरा म्हणजे गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या ‘मिशन गुजरात’ची सुरुवात असल्याचं म्हटलं जातंय. मोदी येथे संध्याकाळी भव्य सभेला संबोधित करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोदींचा रोड शो म्हणजे मिशन गुजरातची सुरुवात ?

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल (१० मार्च) लागला. या निवडणुकीत भाजपाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून विरोधकांना नामोहरम केलंय. उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपासाठी अनेक अंगांनी महत्त्वाची होती. मात्र, येथील जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्याच पारड्यात मतं टाकली आहेत.या निवडणुकीनंतर आता गुजरातची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपाने सुरुवातदेखील केली आहे. आज गुजरातमधील अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला. या रोड शोदरम्यान निवडणुकीतील विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. मोदी यांचा हा रोड शो म्हणजे गुजरातच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीच्या तयारीची सुरुवात आहे, असे म्हटले जात आहे. या रोड शोदम्यान भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

‘जय श्री राम, भारत माता की जय’च्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपने मोठी मेहनत घेतली आहे. मोदींच्या रोड शोदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नरेंद्र मोदी समोर येताच भाजप समर्थक जय श्री राम, भारत माता की जय अशा घोषणा देत होते. आज संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान मोदी भव्य मैदानात भाजप कार्यकर्ते तसेच जनतेला संबोधित करणार आहेत. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.