मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. मी सांगतो आहे ही मोदीची गॅरंटी आहे असं वक्तव्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रगती मैदानातील कनव्हेंशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या वास्तूचं नाव भारत मंडपम असं ठेवण्यात आलं आहे त्यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच विजयाचा दावा केला आहे. तसंच आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहे असंही म्हटलं आहे.

आज भारत मंडपमचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांचे आभार मानले ज्यांनी करोना काळात भारत मंडपम ही वास्तू बांधून पूर्ण केली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगील विजय दिवसाचाही उल्लेख केला. आज कारगील विजय दिवस आहे. देशाच्या शत्रूने जे दुःसाहस दाखवलं होतं त्याला आपल्या लष्करातल्या वीरांनी सडेतोड उत्तर दिलं होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

“२०१४ ला जेव्हा जनतेने आमच्या हाती (भाजपा) देशाचा कारभार दिला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमाकांवर होती. आमच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत हा देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. मी आता हे ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे सांगतो आहे फक्त गप्पा म्हणून नाही. मी हे आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आमच्या तिसऱ्या कार्यकाळात जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचं नाव असेल. ही मोदीची गॅरँटी आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहू शकेल. तसंच आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचा विकासरथ हा अधिक वेगाने धावेल. ” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

काही लोक नकारात्मक विचारधारेचे

“आपल्या देशात काही वेगळ्या विचारधारेचेही लोक आहेत. नकारात्मक विचार करणाऱ्यांची आपल्या देशात कमतरता नाही. भारत मंडपमची निर्मिती रोखण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. कोर्टाच्या फेऱ्याही मारल्या. पण जिथे सत्य असतं तिथे देव असतो यावर माझा विश्वास आहे. आता ही सुंदर वास्तू तुम्हा सगळ्यांसमोर आहे. काही लोकांची प्रवृत्ती असते की चांगल्या कामात खोडा घालायचा. कर्तव्य पथ तयार होत असताना काही कथा सांगितल्या जात होत्या, ब्रेकिंग न्यूज होत होत्या. मात्र कर्तव्य पथ झाल्यानंतर आता हेच लोक दबक्या आवाजात म्हणत आहेत चांगलं झालं. आता असंच भारत मंडपमसाठीही ती टोळी (विरोधक) हे चांगलं झालंय हे छुपेपणानेही स्वीकारतील.”

“कुठलाही देश असू देत, कुठलाही समाज असो तो तुकड्यांमध्ये विचार करुन, काम करुन पुढे जाऊ शकत नाही. आज हे भारत मंडपम ही वास्तू या गोष्टीचीही साक्षीदार आहे की आमचं सरकार किती दूरचा विचार करुन काम करतं आहे” असंही मोदींनी म्हटलं आहे.

दिल्लीत तयार होणार सर्वात मोठं संग्रहालय ही मोदीची गॅरंटी

“२०१४ मध्ये दिल्ली विमानतळाची क्षमता वर्षाला ५ कोटी प्रवासी एवढी होती. आता ती क्षमता साडेसात कोटी झाली आहे. टर्मिनल टू आणि चौथा रनवेही सुरु झाला आहे. दिल्लीत लवकरच जगातलं सर्वात मोठं संग्रहालय युगे युगे भारत हे देखील निर्माण केलं जाणार आहे. मी सांगतोय ही माझी गॅरंटी आहे. आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. काही गोष्टी अकल्पनीय होत्या त्या भारत आज करतो आहे. आपल्या मोठं लक्ष्य गाठायचं आहे. थिंक बिग, अॅक्ट बिग, ड्रीम बिग या सिद्धांतावर भारत पुढे जातो आहे” असंही मोदींनी म्हटलं आहे.

भारत मंडपम या नावामागे कुणाची प्रेरणा?

“भारत मंडपम या नावामागे भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपमची प्रेरणा आहे. आपला भारत लोकशाहीची जननी आहे हे जगाने स्वीकारलं आहे. तामिळनाडूतल्या उत्तरा मेरु ते वैशालीपर्यंत भारत हा आपला गौरव आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी भारत मंडपम हे आपण लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेट आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काही दिवसांनी G20 ची परिषद या ठिकाणी होणार आहे. भारताची पावलं आणि भारताची वाढणारी उंची याची ओळख संपूर्ण जगाला या भारत मंडपम मधून होणार आहे.”

:आज संपूर्ण जगभरात विविध संमेलनं होत असतात. कधी एका देशात तर कधी दुसऱ्या देशात हे कार्यक्रम होतात. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत एक कन्व्हेन्शन सेंटर असणं खूप आवश्यक होतं त्यामुळेच या भव्य प्रासादाची निर्मिती करण्यात आली आहे. २१ व्या शतकात आपल्याला २१ व्या शतकासाठी आवश्यक असलेल्या वास्तूची गरज होती. त्यामुळेच आपण भारत मंडपम हे देशासमोर आपण ठेवलं आहे” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“भारत मंडपम देशात कॉन्फरन्स टुरिझमचं मोठं माध्यम ठरणार आहे. आपलं सिनेमा जगताची ही वास्तू मंच ठरणार आहे. तसंच वास्तू शिल्प, काष्ठ शिल्प आणि इतर कलांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे यात काहीही शंका नाही. हा विशाल परिसर, हे भारत मंडपम हा सर्वात मोठा मंच होईल. या भारत मंडपमची निर्मिती आधीच व्हायला हवी होती. मात्र मला असं वाटतं की अनेक चांगली कामं माझ्या हातूनच व्हावीत असे काही संकेत असावेत त्यामुळे हे सगळं घडतं आहे.” असं म्हणत मोदींनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.