Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर आज मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा पार पडल्यावर आता प्रभू श्रीरामांच्या प्रसन्न मूर्तीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. दरम्यान, या पूजेनंतर नरेंद्र मोदी यांनी श्रीरामाला राष्टांग दंडवत घातला. याचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिल्पकार अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न मूर्तीची पहिली झलक यापूर्वी १८ जानेवारी रोजी समोर आली होती, तर आज आभूषणांनी, फुलांनी आणि तुळशीच्या पानांनी सजवलेली, पिवळी वस्त्रे धारण केलेली श्रीरामांची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामचरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानी श्रीरामाला साष्टांग दंडवतही घातला. या सोहळ्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली.

मंदिराच्या गाभाऱअयात श्रीरामाच्या बालरुपाची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले, मंदिर तिथेच बनवलं आहे जिथे बनवायचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी त्यासाठी आभार मानतो.

हे ही वाचा >> “छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मोदींनी..”, गोविंदगिरी महाराजांचे भावुक विधान; म्हणाले, “श्रीमंत योगी..”

रामलल्लांच्या मूर्तीचं वैशिष्ट्य

गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली रामलल्लांची मूर्ती ही सावळ्या रंगाची आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंचं उंच असून या मूर्तीचं वजन २०० किलो इतकं आहे. पाच वर्षे वय असलेल्या मुलाची उंची ही सरासरी ४५ चे ६० इंच इतकी असते. त्यामुळे रामाच्या या बालरुपाची मूर्ती ५१ इंचांची आहे. तसेच हिंदू धर्मात ५१ हा अंक शुभ मानला जातो.