तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक राजकीय वाद असले तरी शुक्रवारी एका कार्यक्रमात या दोन नेत्यांमधला ताळमेळ पाहायला मिळाला. या दोन नेत्यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोन्ही नेते पायऱ्या उतरताना दिसत आहेत. पायऱ्या उतरत असताना स्टॅलिन यांचा तोल ढासळत होता. तेवढ्यात मोदींनी स्टॅलिन यांना सावरलं. मोदी यांनी स्टॅलिन यांना सावरलं नसतं तर कदाचित स्टॅलिन धडपडले असते. दोन्ही नेत्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

खेलो इंडिया युध गेम्सच्या आयोजनस्थळी जात असताना दोन्ही नेते पायऱ्या उतरत होते. त्याचवेळी स्टॅलिन एका पायरीवर पाय ठेवताना अडखळले. परंतु, मोदी यांनी लगेच त्यांचा डावा हात पकडला आणि त्यांना पडू दिलं नाही. त्यानंतर दोन पावलं चालल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना अभिवादन केलं. यावेळी स्टॅलिन यांचे पूत्र आणि तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन हेदेखील या दोन नेत्यांबरोबर होते.

Devendra fadnavis
वसई : वेळ कमी मागणी भरपूर, देवेंद्र फडणवीस यांचा चित्रफितीद्वारे प्रचार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Devendra Fadnavis on Allegations
Devendra Fadnavis : “मी व्हिडिओ बाहेर दिले नाहीत, ज्यात…”, ‘त्या’ दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं विधान
PM Narendra Modi On Congress
PM Narendra Modi : “काँग्रेसने गरिबी हटावचा खोटा नारा दिला, पण आता…”, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
Narendra Modi
Narendra Modi : “आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं”, पंतप्रधान मोदींचं छ. संभाजीनगरमध्ये वक्तव्य; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया युथ गेम्सचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदी म्हणाले, २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन भारतात करण्याचा आमचा संकल्प आहे. तत्पूर्वी आपण आपल्या खेळाडूंनादेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यूपीए सरकारच्या काळात खेळाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार झाला. परंतु, आपल्या भाजपा सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये यांचा (यूपीए) ‘खेळातला खेळ’ संपवला आहे.

हे ही वाचा >> पंतप्रधानांचे धार्मिक अनुष्ठान; प्राणप्रतिष्ठा सोहळा होईपर्यंत नारळपाण्याचे प्राशन आणि गोसेवा 

दरम्यान, यावेळी एम. के. स्टॅलिन म्हणाले, तमिळनाडूला देशाची क्रीडा राजधानी बनवणे हे डीएमके सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.