PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी गुरुवारी (२२ जून) व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेवेळी मोदी यांना भारतातील मानवाधिकार आणि अल्पसंख्यांकांबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर नरेंद्र मोदी म्हणाले, भारतात लोकशाही आहे. अध्यक्ष जो बायडेन म्हणाले त्याप्रमाणे दोन्ही देशांच्या (भारत आणि ऑस्ट्रेलिया) डीएनएमध्ये लोकशाही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही लोकशाही जगतो. लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित असलेल्या आमच्या संविधानाच्या आधारे आमचं सरकार काम करतं. भारतात जात, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. मानवी मूल्ये आणि मानवाधिकार नसेल तर लोकशाहीच टिकणार नाही. भारत सबका साथ, सबका विश्वास और सबका प्रयास (सर्वांची साथ, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न) यावर चालतो.

पंतप्रधान म्हणाले, भारत एक लोकशाही असलेलं राष्ट्र आहे. आमच्या डीएनएमध्येच लोकशाही आहे. लोकशाही आमचा आत्मा आहे. लोकशाही आमच्या धमण्यांमध्ये आहे. आम्ही लोकशाही जगतो, नरेंद्र मोदी म्हणाले, आमचं सरकार लोकशाही मूल्यांवर आधारित असलेल्या संविधानावर चालतं. आमची राज्यघटना आणि आमच्या सरकारने सिद्ध केलं आहे की, लोकशाहीच सर्वांचा उद्धार करू शकते. तसेच लोकशाहीत जात, पंथ धर्म या गोष्टींना जागा नसते. मानवी हक्क नसतील, मानवी मुल्ये नसतील तर तिथे लोकशाही नसते.

हे ही वाचा >> Video : “भारतात हॅलोविन अन् अमेरिकेत नाटू नाटू…”, व्हाईट हाऊसमधील स्नेहभोजन कार्यक्रमात मोदी नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात व्हाईट हाऊसमधून संयुक्त निवेदन

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेपलिकडील दहशतवादाचा, दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशाचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी होणार नाही, याची खात्री करण्याचे आणि त्यासाठी त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे,” असं व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटलं आहे.