पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित जी-२० देशांच्या संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जगभरात शांतता आणि बंधूभाव निर्माण करणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दहशतवादाचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही घडतंय, त्यापासून कोणीही दूर राहिलेलं नाही. दहशतवादाच्या झळा सगळ्यांनाच बसतायत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संपूर्ण जग हे वेगवेगळ्या संकटांशी संघर्ष करत आहे. संकटांशी झुंजणारं हे जग मानवतेच्या हिताचं नाही. मानवतेसमोर वेगवेगळी आव्हानं आहेत. जगाच्या विकासासमोर जी संकटं आहेत त्यावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीसह आपल्याला पुढं जावं लागेल. वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर हा दृष्टीकोन ठेवून आपल्याला पुढं जावं लागेल.

Narendra Modi in jharkhand
“झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
it is not good for person holding post of Prime Minister visiting house of Chief Justice of country on occasion of Ganapati Puja
गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’
two militants killed in a joint operation by army and police in jammu and kashmir
दोन दहशतवादी ठार ; काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपाताचा कट उधळला
Conflict between military groups in Sudan
यूपीएससी सूत्र : सुदानमधील लष्करी संघर्षाचा भारताच्या हितसंबंधांवरील परिणाम अन् पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा, वाचा सविस्तर…
pakistani army chief asim munir
Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”
Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

दहशतवादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. भारतात दहशतवाद्यांनी आजवर हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. २० वर्षांपूर्वी आमच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला होता. संसदेचं सत्र सुरू असताना दहशतवाद्यांनी आमच्या संसदेला लक्ष्य केलं होतं. खासदारांना ओलीस ठेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा त्यांचा डाव होता. अशा अनेक दहशतवादी कारवाया आणि दहशतवादी संघटनाना तोंड देत भारत इथवर पोहचला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादाच्या व्याख्येबाबत जगातील अनेक देशांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. आता जगाला समजलंय की, दहशतवाद किती मोठं आव्हान आहे. जिथे जिथे दहशतवादी कारवाया घडतात, ज्या कुठल्या स्वरुपात घडतात या घटना मानवतेच्या विरोधातच असतात. त्यामुळे या प्रश्नांवर सर्वांनी कठोर होणं गरजेचं आहे.

हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धाचे उत्तर प्रदेशात पडसाद, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे कडक निर्देश; म्हणाले, “भारताच्या भूमिकेविरोधात…”

नरेंद्र मोदी म्हणाले, मला एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधायचं आहे की, इतक्या वर्षांनंतरही दहशतवादाच्या व्याख्येवर सर्व देशांचं एकमत होत नाही, हे खूप क्लेशदायक आहे. आजही दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये एकमत होत नाही. जगला त्याची प्रतीक्षा आहे. जगाच्या या वृत्तीचा मानवतेच्या शत्रूंना फायदा होत आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत आपण सगळे एकत्र कसं काम करू शकतो यावर जगातील वेगवेगळ्या देशांच्या संसदेने आणि प्रतिनिधींनी विचार करावा.