नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या लक्षद्वीप बेटांच्या दौऱ्यात वैविध्यपूर्ण सागरी जिवांच्या दर्शनाचा आनंद सागरतळाच्या सफरीद्वारे (स्नॉर्कलिंग) लुटला. मोदींनी अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांवरील आपला रोमांचक अनुभव दर्शवणारी छायाचित्रे ‘एक्स’वर सर्वासाठी प्रसृत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवणाऱ्या हिजबुलच्या कमांडरला दिल्ली पोलिसांकडून बेड्या

मोदींनी नमूद केले, की ज्यांना रोमांचकारी अनुभव हवा आहे त्यांनी त्यांच्या पर्यटनस्थळांच्या यादीत लक्षद्वीपचा नक्कीच समावेश करावा. माझ्या येथील वास्तव्यात ‘स्नॉर्कलिंग’चाही प्रयत्न केला. किती आनंददायी अनुभव होता तो! ‘स्नॉर्कलिंग हा एक लोकप्रिय सागरतळ सफरीचा प्रकार आहे. यात तुम्ही समुद्राच्या पृष्ठभागावर पोहताना त्या खालील सागरी जीवनाचा शोध घेता. ‘स्नॉर्कलर’ त्यांच्या पाहण्यासाठी मुखवटा, श्वासोच्छवासासाठी स्नॉर्कल आणि काहीवेळा दिशा आणि गतीसाठी पंख परिधान करतात. मोदींनी लक्षद्वीपच्या प्राचीन समुद्रकिनाऱ्यांवर प्रभातफेरी (मॉर्निग वॉक) आणि समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर ते बसलेले असताना निवांत क्षण टिपणारी काही छायाचित्रेही प्रसृत केली आहेत.

‘लक्षद्वीपचे सौंदर्य, शांततेने मंत्रमुग्ध!’

नैसर्गिक सौंदर्यासह लक्षद्वीपची शांतताही मंत्रमुग्ध करणारी आहे. १४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करता येतील याचा विचार करण्याची संधी मला मिळाली.

नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान