शबरीमला आणि तीन तलाकच्या मुद्द्यावरुन डावे आणि काँग्रेस सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाना साधला आहे. केरळ सरकारकडून आम्ही अशा प्रकारे द्वेषाच्या व्यवहाराची अपेक्षा केली नव्हती. इथे केरळ सरकारचा व्यवहार हा इतिहासात कोणत्याही सरकारकडून किंवा पक्षाकडून देण्यात आलेल्या सर्वात लाजिरवाण्या वागणुकींपैकी एक आहे, अशा शब्दांत मोदींनी टीका केली.
मोदी म्हणाले, आम्हाला माहिती आहे की कम्युनिस्ट लोक भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्माचा सन्मान करीत नाहीत. मात्र, कोणीही त्यांच्याकडून अशा प्रकारे द्वेषपूर्ण वागणुकीची अपेक्षा केली नव्हती. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेस शबरीमला प्रकरणावरुन संसदेत काही आणि पतनमथिट्टात वेगळेच काहीतरी बोलतात.
तिहेरी तलाकवरुन काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेस आणि डावे दोघेही लैंगिक समानता आणि सामाजिक न्यायावरुन मोठ-मोठ दावे करतात. या प्रकरणी मात्र त्यांचं वागण अगदी वेगळ आहे. एनडीए सरकार तिहेरी तलाक संपवण्यासाठी काम करीत आहे. मात्र, डावे आणि काँग्रेसचे लोक याला विरोध करीत आहेत.