पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांना खास भारतीय वस्तू भेट दिल्या. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोदींनी मॅक्रॉन यांना चंदनाच्या लाकडाचा सतार भेट म्हणून दिला. या चंदनाच्या लाकडावर भारतातील प्राचीन शिल्प कोरलेले आहेत. याशिवाय या सतारावर सरस्वती, गणपती आणि मोरही कोरलेला आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी ब्रिगिट मॅक्रॉन यांनाही खास भेट दिली. फ्रान्सच्या पहिल्या महिला नागरिक ब्रिगिट यांना तेलंगणातील प्रसिद्ध पोचमपल्लीची रेशीम साडी भेट म्हणून देण्यात आली. पोचमपल्लीच्या साडीने कापड आणि साडी उद्योगात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या साडीवर अगदी गुंतागुंतीचं नक्षीकाम अगदी सफाईदारपणे केलेलं आहे. तसेच नक्षीकामाची रंगसंगतीही कमालीची सुंदर आहे. त्यामुळेच पोचमपल्लीची ओळख भारताबाहेर अगदी जगभरात झाली आहे.

Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन

संसदेच्या अध्यक्षांना काश्मीरची प्रसिद्ध कार्पेट भेट

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याशिवाय मोदींनी फ्रान्सच्या संसदेचे प्रमुख येल ब्रॉन पिवेट यांना हाताने तयार केलेली काश्मीरचं प्रसिद्ध कार्पेट भेट दिलं. हे कार्पेट जगप्रसिद्ध आहेत. आता त्याची फ्रान्समध्ये जोरदार चर्चा आहे. या कालीनवर खासप्रकारची कलाकुसरही करण्यात आली आहे.

हेही वाचा : फ्रान्सच्या सर्वोच्च किताबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित; अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ प्रदान

मोदींनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना मार्बल इनले वर्क टेबल भेट दिला. राजस्थानमधील संगमरवराच्या दगडापासून तो तयार करण्यात आला आहे. याशिवाय सिनेट अध्यक्षांना चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेलं खास हत्तीशिल्प भेट देण्यात आलं.

Story img Loader