Independence Day Updates Today: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येयधोरणांनुसार कामकाज होईल यावर मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच, वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कोलकात्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
देशात आगामी ५ वर्षांमध्ये ७५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर, राजकारणातील घराणेशाहीला छेद देण्यासाठी देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका मोदींनी मांडली.
PM Narendra Modi Speech Updates from Red Fort: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासीयांना संबोधून भाषण!
आम्ही देशवासीयांसाठी १५०० हून जास्त कायदे रद्द केले. छोट्या छोट्या कारणांसाठी तुरुंगात जावं लागत होतं. असे कायदे आम्ही व्यवस्थेतून बाहेर काढले – नरेंद्र मोदी

२०४७ मध्ये विकसित भारतात सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी असावा. जिथे सरकारचा हस्तक्षेप असेल तिथे कोणतीही कमतरता नसेल – नरेंद्र मोदी

आम्ही केलेल्या सुधारणांचा लाभ ज्यांच्याकडे कुणी बघत नव्हतं, त्यांना झाला आहे. दलित, मागास, आदिवासी, दुर्गम भागात राहणारे अशा लोकांच्या गरजांची पूर्तता आम्ही केली आहे. सर्वांगीण विकासाचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचा सगळ्यात मोठा लाभ आपल्या तरुणांना होतो. त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतात. सर्वाधिक रोजगाराची संधी त्यांना याच काळात मिळाली आहे. मध्यमवर्गासाठी क्वालिटी ऑफ लाईफ उपलब्ध झाली – नरेंद्र मोदी

मी आज म्हणू शकतो की जेव्हा नीती आणि नियत चांगली असते, बरोबर असते, तेव्हा आपल्याला योग्य ध्येय साध्य करता येतं – नरेंद्र मोदी

किती मोठा बदल घडत आहे तुम्ही पाहा. महिला बचत गटानुसार १० वर्षांत १० कोटी नव्या महिला अशा बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. सामान्य परिवारातील या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत. जेव्हा महिला आर्थिक स्वावलंबी होतात, तेव्हा मोठ्या सामाजिक बदलाची ती नांदी असते. मला गर्व आहे या गोष्टीवर. त्यासोबतच आपले सीईओ जगभरातल्या कंपन्यांमध्ये आपली छाप सोडत आहेत – नरेंद्र मोदी

पर्यटन, लघु उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळण-वळण, शेती अशा प्रत्येक क्षेत्रात नवीन व्यवस्था रुजू लागली आहे. आपण जगातल्या सर्वोत्तम पद्धती लागू करून विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. आपल्या नव्या धोरणांमुळे या सगळ्या क्षेत्रांत नवी ताकद मिळू लागली आहे – नरेंद्र मोदी

देशाला पुढे नेण्यासाठी अनेक वित्तधोरणं तयार केली जात आहेत. आज २०-२५ वर्षांचा तरुण १० वर्षांपूर्वी १२-१५ वर्षांचा होता. त्यानं त्याच्या डोळ्यांसमोर देशात झालेला बदल पाहिला आहे. या १० वर्षांत त्याच्या स्वप्नांना आकार मिळाला आहे. त्याच्यात एक नवीन चेतना निर्माण झाली आहे. देशभरात आज भारताचा मान वाढला आहे, भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. तरुणांसाठी देशभरात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता देशातल्या तरुणांना धीम्या गतीने चालण्याची इच्छा नाही. त्याला मोठी उडी घ्यायची आहे. नवी क्षितिजं पादाक्रांत करायची आहेत. हा भारतासाठी सुवर्णकाळ आहे. ही संधी आपल्याला जाऊ द्यायची नाही. याच संधीला साधून आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण वाटचाल केली तर विकसित भारताचं लक्ष्य आपण पूर्ण करू – नरेंद्र मोदी

दुर्दैवानं आपल्या देशात स्वातंत्र्य तर मिळालं, पण लोकांना एक प्रकारे मायबाप संस्कृतीतून जावं लागलं. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे. आज सरकार स्वत: लाभार्थ्यांकडे जाते, त्याच्या घरात पाणी-वीज पोहोचवते, त्याच्या घरी गॅस पोहोचवते, सरकार स्वत: त्याला आर्थिक मदत देऊन विकास करण्यासाठी प्रोत्साहन देते, त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी पाऊलं उचलते. मोठ्या सुधारणांसाठी आमचं सरकार बांधील आहे – नरेंद्र मोदी

आपल्या लघु उद्योगांसाठी तर बँक सर्वात मोठी सहाय्यक असते. रोजच्या गरजांसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. ते आपल्या बँकांनी केलं. – नरेंद्र मोदी

मी सुधारणांवर बोललो तर अनेक तास निघून जातील. पण मी एक छोटंसं उदाहरण देतो. बँकिंग क्षेत्रात विकास होत नव्हता, विस्तार होत नव्हता, विस्तार होत नव्हता. आम्ही बँकिंग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळेच आज आपल्या बँकांनी जगभरातल्या समर्थ बँकांमध्ये स्थान मिळवलं आहे. सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याची मोठी ताकद बँकांमध्ये असते. मला आनंद आहे की माझे पशुपालक, मत्यपालकही बँकांमधून लाभ घेत आहेत – नरेंद्र मोदी

या देशानं असाही काळ पाहिलाय जेव्हा होईल, केलं जाईल, हे तर चालेलच, आपण कशाला कष्ट करायचे, पुढची पिढी पाहून घेईल, आपल्याला संधी मिळाली आहे मजा करून घ्या, पुढचा येईल तो बघून घेईल असे विचार होते. कुणास ठाऊक का पण देशात जैसे थे परिस्थितीचं वातावरण बदललं होतं. लोक म्हणायचे सोडा, आता काही होणार नाहीये. असंच चालणार असं म्हणायचे. आम्हाला या मानसिकतेला छेद द्यायचा होता. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. देशातला सामान्य नागरिक बदलाच्या प्रतीक्षेत होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे तो संकटांचा सामना करून गुजराण करत राहिला. आम्हाला जबाबदारी दिली गेली आणि आम्ही मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. गरीब, मध्यम वर्ग, वंचित वर्ग, शहरी नागरीक, तरुणांच्या आकांक्षा यामध्ये बदल आणण्याचा मार्ग आम्ही निवडला. सुधारणा करण्याचा मार्ग निवडला. सुधारणेसाठीची आमची बांधिलकी पिंक पेपरच्या संपादकीयापर्यंत मर्यादित नाही. ती ४ दिवसांच्या कौतुकासाठी नाही. कुठल्या नाईलाजामुळे नाहीये. देशाला मजबुती देण्याच्या निश्चयाने आहे. आपला सुधारणांचा मार्ग एक प्रकारे विकासाची ब्लू प्रिंट झाला आहे. या आमच्या सुधारणा तज्ज्ञांसाठी फक्त चर्चेचा विषय नाही. आम्ही राजकीय नाईलाजाने सुधारणा केलेल्या नाहीत. आम्ही राजकीय गुणाकार-भागाकाराचा विचार करत नाही. आमचा एकच संकल्प आहे, राष्ट्र प्रथम. त्याच आधारावर आम्ही निर्णय घेतो – नरेंद्र मोदी

हे घडवण्यासाठी नियोजित प्रयत्न झाले आहेत. सुधारणांच्या प्रयत्नांना शक्ती दिली गेली आहे. जेव्हा राजकीय नेतृत्वाचा संकल्प असेल, जेव्हा सरकारी यंत्रणा त्या लागू करण्यासाठी समर्पण भावाने कामाला लागते, देशाचे नागरिक ते जनआंदोलन म्हणून स्वीकारतो तेव्हा निश्चित परिणाम दिसतोच दिसतो – नरेंद्र मोदी

आपण कसं विसरू शकतो करोनाचा संकटकाळ. जगात सर्वात वेगाने कोट्यवधी लोकांना लसीकरणाचं काम आपल्या याच देशात झालं. याच देशात कधीकाळी दहशतवादी आपल्याला येऊन मारून निघून जात होते. पण जेव्हा देशाचं लष्कर सर्जिकल स्ट्राईक करतं, एअरस्ट्राईक करतं तेव्हा देशवासीयांचा उर अभिमानानं भरून जातो. याचमुळे १४० कोटी देशवासीयांचं मन आत्मविश्वासाने भरून आलं आहे – नरेंद्र मोदी

जेव्हा लाल किल्ल्यावरून सांगितलं जातं की भारताच्या १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवली जाते आणि तिथे वीज पोहोचते तेव्हा सामान्य माणसाचा विश्वास वाढतो. जेव्हा स्वच्छ भारतावर बोललं जातं तेव्हा या देशातले सर्वोच्च स्थानावर बसलेल्या लोकांपासून गावागावांतल्या लोकांपर्यंत स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित होतं ती मी समजतो की भारतातली नवी जाणीव आहे – नरेंद्र मोदी

या सूचनांमध्ये जगातला स्किल कॅपिटल भारताला बनवण्याची सूचना केली. काहींनी भारताला उत्पादनाचं ग्लोबल हब बनवण्याची सूचना केली. काहींनी भारतीय विद्यापीठं ग्लोबल व्हावीत अशी सूचना केली. काहींनी माध्यमं ग्लोबल व्हावीत अशी सूचना केली. काहींनी आपला युवक जगाचं पहिलं प्राधान्य राहायला हवा अशी सूचना केली. शेतकरी श्री अन्न उत्पादित करतात, त्या सुपर फूडला जगातल्या प्रत्येक डायनिंग टेबलवर पोहोचवायचं आहे – नरेंद्र मोदी

विकसित भारत २०४७ हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यामागे कठोर कष्ट चालू आहेत. कोट्यवधी नागरिकांच्या सूचना घेतल्या जात आहेत. आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या. मला आनंद आहे की देशाच्या कोट्यवधी नागरिकांनी विकसित भारत २०४७ साठी अगणित सूचना केल्या आहेत. प्रत्येक देशवासीयाचं स्वप्न त्यात प्रतिबिंबित झालंय. तरुण, वृद्ध, ग्रामीण-शहरी नागरिक, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी अशा सगळ्यांनी २०४७ मध्ये देश स्वातंत्र्यशताब्दी सादरी करत असेल तेव्हाच्या विकसित भारतासाठी सूचना केल्या आहेत – नरेंद्र मोदी

एक काळ होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान देण्यासाठी बांधील होते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज देशासाठी जगण्यासाठी बांधील होण्याचा हा काळ आहे. आपला हा संकल्प समृद्ध भारत बनवू शकेल – नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवा. शेकडो वर्षांची गुलामगिरी. प्रत्येक काळ संघर्षाचा राहिला. तरुण, महिला, आदिवासी, शेतकरी या सगळ्यांनीच अविरत लढा दिला. इतिहास साक्षी आहे की १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आधीही देशाच्या अनेक आदिवासी भागांमधून स्वातंत्र्याचा लढा दिला जात होता. गुलामगिरीचा एवढा मोठा काळ, जुलुमी शासक, अखंड यातना, सामान्यांचा विश्वास तोडण्याचा प्रत्येक मार्ग हे सगळं असूनही तेव्हाच्या लोकसंख्येनुसार स्वातंत्र्यापूर्वी ४० कोटी देशवासीयांनी संघर्षाचा संकल्प केला. भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आपल्याला गर्व आहे की आपल्या नसांमध्ये त्यांचच रक्त आहे. ते आपले पूर्वज होते. ४० कोटी लोकांनी जगाच्या महासत्तेला उचलून फेकून दिलं होतं. आपल्या नसांमध्ये रक्त असणाऱ्या आपल्या पूर्वजांनी ४० कोटी असूनही गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या, ४० कोटी लोक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात, तर १४० कोटी देशवासीय, नागरिकांनी ठरवलं, संकल्प केला तर कितीही आव्हानं आली, कितीही कमतरता असल्या, कितीही साधनांसाठी लढा द्यावा लागला तरी सर्व संकटं पार करून आपण समृद्ध भारत, २०४७ च्या विकसित भारताचं ध्येय साध्य करू शकतो – नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांच्या चिंता वाढत आहेत. नैसर्गिक संकटात अनेक लोकांनी आपल्या स्वकीयांना गमावलं आहे. संपत्ती गमावली आहे. देशानंही संपत्तीचं नुकसान भोगलंय. मी त्या सगळ्यांप्रती आज संवेदना व्यक्त करतो आणि हा विश्वास देतो की हा देश या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत उभा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण संपन्न