Independence Day Updates Today: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येयधोरणांनुसार कामकाज होईल यावर मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच, वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कोलकात्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
देशात आगामी ५ वर्षांमध्ये ७५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर, राजकारणातील घराणेशाहीला छेद देण्यासाठी देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका मोदींनी मांडली.
PM Narendra Modi Speech Updates from Red Fort: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासीयांना संबोधून भाषण!
या देशानं असाही काळ पाहिलाय जेव्हा होईल, केलं जाईल, हे तर चालेलच, आपण कशाला कष्ट करायचे, पुढची पिढी पाहून घेईल, आपल्याला संधी मिळाली आहे मजा करून घ्या, पुढचा येईल तो बघून घेईल असे विचार होते. कुणास ठाऊक का पण देशात जैसे थे परिस्थितीचं वातावरण बदललं होतं. लोक म्हणायचे सोडा, आता काही होणार नाहीये. असंच चालणार असं म्हणायचे. आम्हाला या मानसिकतेला छेद द्यायचा होता. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. देशातला सामान्य नागरिक बदलाच्या प्रतीक्षेत होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे तो संकटांचा सामना करून गुजराण करत राहिला. आम्हाला जबाबदारी दिली गेली आणि आम्ही मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. गरीब, मध्यम वर्ग, वंचित वर्ग, शहरी नागरीक, तरुणांच्या आकांक्षा यामध्ये बदल आणण्याचा मार्ग आम्ही निवडला. सुधारणा करण्याचा मार्ग निवडला. सुधारणेसाठीची आमची बांधिलकी पिंक पेपरच्या संपादकीयापर्यंत मर्यादित नाही. ती ४ दिवसांच्या कौतुकासाठी नाही. कुठल्या नाईलाजामुळे नाहीये. देशाला मजबुती देण्याच्या निश्चयाने आहे. आपला सुधारणांचा मार्ग एक प्रकारे विकासाची ब्लू प्रिंट झाला आहे. या आमच्या सुधारणा तज्ज्ञांसाठी फक्त चर्चेचा विषय नाही. आम्ही राजकीय नाईलाजाने सुधारणा केलेल्या नाहीत. आम्ही राजकीय गुणाकार-भागाकाराचा विचार करत नाही. आमचा एकच संकल्प आहे, राष्ट्र प्रथम. त्याच आधारावर आम्ही निर्णय घेतो – नरेंद्र मोदी
PM Narendra Modi Red Fort Speech: लाल किल्ल्यावरून मोदींचं काँग्रेसवर टीकास्र!
नोकरदार महिलांसंदर्भात मोदींनी भाषणात केला उल्लेख
https://x.com/ANI/status/1823918446465462412
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावला तो क्षण…
https://x.com/mygovindia/status/1823908081882780017
लाल किल्ल्यावरील भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केलं.
वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या विकासात अडसर ठरत आहेत. कोणतंही काम निवडणुकांशी जोडणं सोपं झालंय. पण त्यासाठी एका समितीनं वन नेशन, वन इलेक्शनसंदर्भात चांगला अहवाल दिला आहे. मी देशाच्या राजकीय पक्षांना, संविधान प्रेमींना आग्रह करतो की भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन, वन इलेक्शनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल – नरेंद्र मोदी

देशात घराणेशाही, जातीवाद भारताच्या लोकशाहीचं मोठं नुकसान करत आहे. देशाला, राजकारणाला आपल्याला घराणेशाही व जातीवादापासून मुक्ती द्यावी लागेल. आपलं एक ध्येय हेही आहे की आपण लवकरात लवकर राजकीय दृष्ट्या १ लाख अशा तरुणांना पुढे आणू इच्छितो, ज्यांच्या कुटुंबात कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी असणार नाही. अशा होतकरू तरुणांनी राजकरणात यावं जेणेकरून जातीवाद, घराणेशाहीपासून मुक्ती मिळावी. त्यांना हव्या त्या पक्षात त्यांनी जावं. तिथून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुढे यावं. देशानं ठरवावं की तरुण रक्त पुढे आलं तर नवा विचारही येईल. लोकशाही समृद्ध होईल – नरेंद्र मोदी

सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत सुनावणी घेतली आहे. चर्चा झाली आहे. त्यामुळे संविधान निर्मात्यांचं स्वप्नं पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. देशात यावर व्यापक चर्चा व्हावी. त्यासंदर्भात सूचना पुढे याव्यात. मी सांगेन की देशात आपण कम्युनल सिविल कोडमध्ये ७५ वर्षं घालवली. आता देशाला सेक्युलर सिविल कोडची गरज आहे. तेव्हा कुठे देशात धर्माच्या आधारावर होणारे भेदभावांपासून आपल्याला मुक्ती मिळेल – नरेंद्र मोदी

देशवासीयांनी कर्तव्यभाव बाळगायला हवा. सरकारपासून नागरिकांपर्यंत सगळ्यांचे कर्तव्य आहेत. १४० कोटी देशवासीयांचेही कर्तव्य आहेत. आपण आपली कर्तव्य पाळली, तर अधिकारांचं संरक्षण आपोआप होतं. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज पडत नाही – नरेंद्र मोदी

बांगलादेशमध्ये जे काही झालं, त्याबाबत शेजारी राष्ट्र म्हणून चिंता वाटणं मी समजू शकतो. मी आशा करतो की तिथे लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत होईल. विशेषत: तिथल्या अल्पसंख्यक हिंदू समुदायाची सुरक्षा निश्चित व्हावी अशी मी आशा करतो. आपले शेजारी देश सुख-शांतीच्या मार्गाने चालावेत अशी भारताची इच्छा आहे. येत्या काही दिवसांत बांगलादेशाच्या विकासयात्रेत आपल्या नेहमीच शुभेच्छा असतील – नरेंद्र मोदी

आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला आहे. याचे परिणाम मला भोगावे लागतील हे मला माहिती आहे. माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय. पण देशापेक्षा माझी प्रतिष्ठा मोठी नाही. देशाच्या स्वप्नांपेक्षा मोठं माझं स्वप्न असू शकत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील माझा लढा चालूच राहील. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई नक्की होईल. त्यांच्यासाठी भीतीचं वातावण मला तयार करायचं आहे. पण सगळ्यात मोठं नवं आव्हान निर्माण झालं आहे. भ्रष्टाचाऱ्यांशी लढा द्यायचा आहेच. पण समाजात उच्चस्तरावर एक बदल आलाय. ते सर्वात मोठं आव्हान आहे. कुणी कल्पना करू शकतं का की माझ्याच देशात एवढं महान संविधान असूनही काही लोक असे आहेत जे खुलेआम भ्रष्टाचाराची वाहवा करत आहेत. समाजात ही बिजं रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांची स्वीकारार्हता वाढवण्याचा प्रयत्न समाजासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जर भ्रष्टाचाऱ्यांची वाहवा होईल, तर आज भ्रष्टाचार न करणाराही त्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे – नरेंद्र मोदी

असंख्य संकटं आहेत. देशातही आहेत आणि बाहेरही आहेत. आपण जसजसे ताकदवान होऊ, तसतशी संकटं, आव्हानंही वाढणार आहेत. मला त्याचा अंदाज आहे. पण मी अशा शक्तींना सांगू इच्छितो की भारताचा विकास कुणासाठीही संकट घेऊन येत नाही. आम्ही जगभरात समृद्ध होतो तेव्हाही आपण कधीही जगाला युद्धात ढकललं नाही. आपण बुद्धाचा देश आहोत, युद्ध आपला मार्ग नाही. मी जगातल्या समुदायाला विश्वास देतो की तुम्ही भारताचे संस्कार, हजारो वर्षांचा इतिहास समजून घ्या. तुम्ही आम्हाला संकट मानू नका. पण मी देशवासीयांना सांगेन की आव्हानं कितीही असो, आव्हानांना आव्हान देणं हे भारताच्या स्वभावात आहे. आपण थांबणार नाही. संकल्पाच्या पूर्ततेसाठी १४० कोटी देशवासीयांचं भाग्य बदलण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही – नरेंद्र मोदी

आपण संकल्प करून पुढे वाटचाल करतोही आहोत. पण हेही खरं आहे की काही लोक प्रगती पाहू शकत नाहीत. भारताचं चांगलं चिंतू शकत नाहीत. जोपर्यंत स्वत:चं भलं होत नाही, तोपर्यंत इतरांचं भलं त्यांना बघवत नाही. देशाला अशा लोकांपासून वाचावं लागेल. हे निराशेच्या गर्तेत गेलेले लोक आहेत. असे मूठभर लोक, जेव्हा त्यांच्या हातात विकृती वाढत असते, तेव्हा ती सर्वनाशासाठी कारणीभूत ठरते. तेव्हा देशाचं एवढं नुकसान होतं की त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे असे निराशावादी लोक फक्त निराशच नाही, त्यांच्या मनात विकृती तयार होत आहे. ती विकृती सर्वनाशाची स्वप्नं पाहात आहे. देशाला हे समजून घ्यावं लागेल. मी देशवासीयांना सांगू इच्छितो की आपल्या चांगल्या विचारांनी, प्रामाणिकपणाने आम्ही सर्व संकटांनंतरही चुकीच्या मार्गावर जाणाऱ्यांचं मन जिंकून देशाला पुढे नेण्याच्या संकल्पात कधीच मागे हटणार नाही – नरेंद्र मोदी

१८५७ च्या आधीही इंग्रजांना नाकी नऊ आणणारे आपले आदिवासी बांधव होते. भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती आता येत आहे. समाजातील छोट्यात छोटी व्यक्ती समाजासाठी काय भावना ठेवते, त्याचं उदाहरण भगवान बिरसा मुंडा यांच्यापेक्षा दुसरं कुठलं असू शकतं? – नरेंद्र मोदी

भारतानं जी-२० चं आयोजन केलं. जगभरात जी-२० चं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठेच झालं नाही. पण भारतात ते झालं. २०३६ ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी माझं सरकार काम करत आहे – नरेंद्र मोदी

२०३० पर्यंत देशात वीज उत्पादन ५०० गिगावॉटपर्यंत न्यायचं ध्येय निश्चित केलं आहे. जगातल्या लोकांसमोर मी जेव्हा ५०० गिगावॉट बोलतो, तेव्हा ते माझ्याकडे बघायला लागतात. पण आपलं ते ध्येय आहे आणि ते आपल्याला साध्य करायचं आहे – नरेंद्र मोदी

जगभरातल्या अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करू इच्छित आहेत. माझं राज्य सरकारांना आवाहन आहे. ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरणं ठरवा. सर्व राज्यांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे नेण्यासाठी स्पर्धा व्हायला हवी. त्या राज्यात गुंतवणूक गेली तर त्या राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जागतिक गरजांनुसार राज्यांनी धोरणांमध्ये बदल करायला हवा. जमीनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. राज्य सराकर जेवढे प्रयत्न करेल, तेवढे गुंतवणूकदार कधीच परत जाणार नाहीत. फक्त भारत सरकारचं हे काम नाही. राज्य सराकरांनीही काम करायला हवं. तो प्रकल्प त्या राज्यात लागणार आहे. राज्य सरकारांनी आपल्या जुन्या सवयी बदलून स्पष्ट धोरणानिशी पुढे यायला हवं – नरेंद्र मोदी

कधीकाळी आपण २ जी साठी संघर्ष करत होतो. पण आज देशात सर्वात वेगाने ५ जी पसरलं आहे. पण एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाहीये. आम्ही ६ जीवर वेगाने काम करत आहोत. संरक्षण क्षेत्रासाठी कितीही तरतूद असली, तरी कुणी विचार करत नव्हतं की ही तरतूद जाते कुठे? हा सगळा पैसा विदेशातून साहित्य खरेदीत जात होता. आता आम्हाला वाटतं की आपण आत्मनिर्भर व्हावं – नरेंद्र मोदी

आपल्या देशात सवय झाली होती की देशाला कमी लेखणं, गौरवाची भावना नसणं हे दिसत होतं. देशाला या गोष्टींमधून बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आहे – नरेंद्र मोदी

आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. महिला नेतृत्वही करत आहेत. संरक्षण क्षेत्रातही महिलांची ताकद दिसत आहे. पण दुसरीकडे काही चिंताजनक गोष्टीही समोर येतात. मी आज पुन्हा एकदा यावर वेदना व्यक्त करत आहे. समाज म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या माता-बहिणींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशाचा आक्रोश आहे. नागरिकांचा आक्रोश आहे. तो मी समजू शकतो. आपल्या देशाला, समाजाला, आपल्या राज्य सरकारांना या गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील. महिलांविरोधातील गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि अमानुष कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी हा विश्वास निर्माण व्हायला हवा. बलात्काराची घटना घडते तेव्हा त्याची खूप चर्चा होते. माध्यमांमध्ये येतं. पण जेव्हा अशा लोकांना शिक्षा होते, तेव्हा त्याची तेवढी चर्चा होत नाही. मला वाटतं ती मोठ्या प्रमाणावर व्हायला हवी. तेव्हा कुठे अशी कृत्य करणाऱ्यांना जरब बसेल. असं पाप केल्यावर मोठी शिक्षा होते, फाशी होते ही भीती त्यांच्या मनात बसायला हवी – नरेंद्र मोदी

आपल्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी आम्ही त्यांना सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मदत देत आहोत – नरेंद्र मोदी

पुढच्या पाच वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात ७५ हजार नव्या जागा निर्माण केल्या जातील. विकसित भारत स्वस्थ भारतही असायला हवा. त्यासाठी आम्ही पोषणालाही प्राधान्य दिलं आहे – नरेंद्र मोदी

जग वेगाने बदलत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण विज्ञानाला महत्त्व देणं वाढवायला हवं. चांद्रयानाच्या यशानंतर आपल्या शाळा-कॉलेजांमधून विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत नवीन उत्साह दिसून येत आहे. आम्ही त्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे अनेक निर्णय घेतले आहेत. अर्थसंकल्पात आम्ही १ लाख कोटी रुपये संशोधन आणि विकासासाठी दिले आहेत – नरेंद्र मोदी

आम्ही बिहारच्या नालंदा विद्यापीठाचं पुनर्निर्माण केलं आहे. मी सगळ्या सरकारांना सांगेन की भाषेमुळे देशाच्या टॅलेंटसमोर अडचणी येता कामा नयेत. यासाठी आपल्याला मातृभाषेला अधिकाधिक महत्त्व द्यायला हवं – नरेंद्र मोदी

६० वर्षांनंतर सातत्याने तिसऱ्यांदा जनतेनं आम्हाला देशसेवेची संधी दिली आहे. माझ्या १४० कोटी देशवासीयांनी जे आशीर्वाद दिले आहेत, त्यात माझ्यासाठी एकच संदेश आहे, जनजनची सेवा. प्रत्येक परिवाराची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा. सेवाभावाने समाजाच्या शक्ती साध्य करून विकासाच्या नव्या क्षितिजांवर पोहोचणं, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करणं. मी देशवासीयांसमोर नतमस्तक होतो. आपल्याला नव्या उत्साहाने काम करायचं आहे. जे झालंय, त्यावर समाधानी मानणारे आपण नाहीत. आपले संस्कार वेगळे आहेत. नवी क्षितिजं पार करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे – नरेंद्र मोदी

मी करोना काळाबाबत विचार करतो तेव्हा.. करोनाच्या काळात सर्वात वेगाने अर्थव्यवस्था विकसित करणारा देश भारत आहे. तेव्हा वाटतं की आपली दिशा योग्य आहे. जेव्हा सर्व मतभेदांना बाजूला सारून प्रत्येक देशात तिरंगा फडकावला जातो, तेव्हा वाटतं आपली दिशा योग्य आहे. आज प्रत्येक देश तिरंगा आहे – नरेंद्र मोदी

सामान्य माणूस पंचायत पातळीवरही संकटांचा सामना करत आहे. आपण जर त्या अडचणी दूर केल्या, तर त्या नागरिकांचा विश्वास मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल – नरेंद्र मोदी

देशात जवळपास ३ लाख स्थानिक स्वराज्य संस्था काम करत आहेत. मी त्यांना आवाहन करतो की जर तुम्ही वर्षभरात तुमच्या स्तरावर सामान्य माणसांसाठी फक्त दोन सुधारणा जरी केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली तर आपण बघता बघता २५-३० लाख सुधारणा करू शकतो. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा होतील, तेव्हा सामान्य व्यक्तीचा विश्वास किती वाढेल? – नरेंद्र मोदी

मी तरुणांना आवाहन करतो की तुम्हाला तुमच्याकडे ज्या काही अडचणी दिसत आहेत, त्याबाबत सरकारांना लिहून पाठवा. आज सरकारं संवेदनशील झाली आहेत. सगळे तुमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करतील – नरेंद्र मोदी

कित्येक वर्षांपासून आपल्याकडे जे गुन्हेगारी कायदे होते, ते आम्ही बदलले – नरेंद्र मोदी