PM Narendra Modi Speech in Winter Session : संविधानाचा ७५ वर्षांचा गौरवशाली इतिहासाचा प्रवास यावर लोकसभेत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ९० च्या दशकातील अनेर राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. केवळ एका मतामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सरकार सोडावं लागलं होतं. तेही असंवैधानिक कृती करू शकले असते, पण नैतिकतेने पराभव स्वीकारला असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “१९९६ मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उदयाला आला. राष्ट्रपतींनी संविधानाच्या भावनेनुसार सर्वांत मोठ्या पक्षाला पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी बोलावलं. त्यानंतर १३ दिवस सरकार चाललं. जर संविधानाच्या स्पिरिटप्रती आमच्या भावना नसत्या तर आम्हीही सत्तासूख भोगू शकत होतो. पण अटल बिहारी वाजपेयींनी सौदेबाजीचा मार्ग स्वीकारला नाही. संविधानाचा मार्ग स्वीकारला. १३ दिवसांनंतर राजीनामा देणं त्यांनी स्वीकारलं.”
हेही वाचा >> PM Narendra Modi : नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित नेहरूंचं ‘ते’ विधान वाचून दाखवलं; इंदिरा गांधींवरही टीकास्र!
“एवढंच नव्हे १९९८ मध्ये एनडीएचं सरकार होतं. परंतु, आम्ही नाही तर कोणी नाही असा या कुटुंबाचं खेळ चालला होता. त्यावेली मतदान झालं. बाजारात माल तेव्हाही विकला जात होता. परंतु, संविधानाच्या भावनेप्रती समर्पित अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने एका मताने पराभव स्वीकारला, राजीनामा दिला. पण असंवैधानिक कृत्य केलं नाही. हा आमचा इतिहास आणि संस्कृती आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
हेही वाचा >> १९९९ चा सत्तासंघर्ष: वाजपेयींचं सरकार एका मतानं कुणामुळे पडलं? शरद पवार, गिरधर गमांग की मायावती?
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ संकल्प जाहीर केले.
- नागरीक असो वा सरकार सर्वांनी आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे
- प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजाला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्वांच्या साथीने, सर्वांचा विकास झाला पाहिजे.
- भ्रष्टाचाराच्या प्रती शून्य सहिष्णुता असावी. भ्रष्टाचाऱ्याची सामाजिक स्वीकार्यता नसली पाहिजे.
- देशाचा कायदा, नियम, परंपरांचं पालन करण्यास देशाच्या नागरिकांना गर्व असला पाहिजे.
- गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती असावी.
- देशाच्या इतिहासावर गर्व असावा
- देशाच्या राजकारणात घराणेशाहीतून मुक्ती मिळो..
- संविधानाचा सन्मान व्हावा. संविधानाचे हत्यार बनू नये.
- संविधानाच्या भावनेप्रती समर्पण ठेवून ज्यांना आरक्षण मिळतंय ते कोणी रोखू नये.
- संविधानाच्या निहित भावना We the People हा मंत्र घेऊन पुढे जाऊ… विकसित भारताचं स्वप्न सदनातील प्रत्येकाचं असलं पाहिजे.
- २०४७ मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत असला पाहिजे.