Pm Narendra Modi : संसदेत दोन्ही सदनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षाने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये अमेरिकेतून भारतात आणल्या जाणाऱ्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी काँग्रेसवर भरपूर आरोप केले. पार्श्वगायक किशोर कुमार यांनी काँग्रेससाठी गाणं म्हटलं नाही म्हणून त्यांच्यासाठी आकाशवाणीचे दरवाजे बंद करण्यात आले असं मोदींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
हृदयानाथ मंगेशकर यांनी वीर सावरकरांसाठी गाणं तयार केलं. त्यावेळी त्यांची आकाशवाणीतून हकालपट्टी करण्यात आली. आपल्या देशाने आणीबाणीचाही काळ पाहिला आहे. संविधान कसं चिरडलं गेलं, संविधानाचा आत्मा तुडवण्यात आला हे देशाला माहीत आहे.
देवानंद यांचे चित्रपट बंद केले, किशोर कुमार यांना आकाशावणीवर बंदी घातली
प्रसिद्ध सिनेकलाकार देवानंद यांना सांगण्यात आलं की आणीबाणीला पाठिंबा द्या. मात्र देवानंद यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसने दूरदर्शनवर त्यांच्या चित्रपटांना बंदी घालण्यात आली. जे संविधानाबाबत बोलतात त्यांनी संविधान खिशात ठेवलं त्याचाच हा परिणाम आहे. पार्श्वगायक किशोर कुमार यांनी गाणं म्हणण्यास नकार दिला, त्यामुळे आकाशवाणीवर त्यांच्या गाण्यांवर बंदी घातली. हे दिवस देश कधीही विसरु शकत नाही. जे लोकशाहीच्या गोष्टी करतात त्यांनी आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीससह अनेक महान नेत्यांच्या हातात बेड्या घातल्या गेल्या होत्या. देशाचे प्रसिद्ध नेते, त्यांना बेड्या घालण्यात आल्या साखळदंडाने बांधण्यात आलं होतं. आज ते लोक संविधानाबाबत बोलत असतील तर त्यांच्या तोंडी तो शब्द शोभत नाही.
सत्तेच्या सुखासाठी कुटुंबं देशोधडीला लागली हे वास्तव-मोदी
सत्तेच्या सुखासाठी आणि शाही कुटुंबाच्या अहंकारासाठी लाखो कुटुंबं त्या काळात देशोधडीला लागली. आपल्या देशाला तुरुंग करण्यात आलं होतं. अत्यंत मोठा संघर्ष झाला, स्वतःला तीस मार खाँ समजणाऱ्यांना नंतर गुडघे टेकावे लागले. भारताच्या नसांनसांत लोकशाही भिनलेली आहे त्यामुळेच असं घडलं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी शेर ऐकवत खरगेंना लगावला टोला
माननीय खरगे अनेकदा शेरोशायरी करतात. आम्हीही त्याची मजा घेतो. एक शेर मीही वाचला होता तो सांगतो, तमाशा करने वालों को क्या खबर? हमने कितने तुफानों को पार कर दिया जलाया है असंही नरेंद्र मोदी म्हणतो. मल्लिकार्जुन खरगे हे वरिष्ठ नेते आहेत मी त्यांचे सन्मान करतो. या राजकारणातील असामी आहेत.