पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’ अर्थात ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या मार्गाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. याच मार्गावर प्रजासत्ताक दिन परेडसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होत असतात. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. उद्घाटनानंतर बोस यांच्या जीवनावर आधारीत ड्रोन शोचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात ‘शिंदे प्रयोग’? ; अखिलेश यादवांचा के पी मौर्याना प्रस्ताव, भाजपची टीका

दरम्यान, सरकारकडून पुढील चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेला ‘कर्तव्य पथ’ हा हिरवाईने नटलेला आहे. १६.५ किलोमीटरचा हा रस्ता लाल ग्रेनाईटने बनलेला आहे. या मार्गावर सुशोभित कालवे, अत्याधुनिक सार्वजनिक सुविधा, विविध राज्यांची खाद्यसंस्कृती दर्शवणारी १६ दुकाने उभारण्यात आली आहेत.

नितीश कुमारांच्या भेटीसाठी पवार एक दिवस आधी दिल्लीत ; विरोधकांच्या ऐक्यावर दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे चर्चा

पर्यटकांसाठी ॲम्फी थिएटर सुविधादेखील या मार्गावर आहे. या परिसरात १ हजार गाड्यांच्या पार्किंगची क्षमता असलेल्या ४ अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. विविध प्रदर्शने आणि रात्रीच्या आकर्षक प्रकाश व्यवस्थेमुळे पर्यटकांना कर्तव्यपथाचा सुखद अनुभव घेता येणार आहे. कर्तव्यपथाची उभारणी करताना पर्यावरण संवर्धनाचे भानही ठेवण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे नियोजन, ऊर्जा बचतीसाठी आवश्यक यंत्रणा या परिसरात बसवण्यात आली आहे. कर्तव्यपथ परिसरात सहा पार्किंग व्यवस्था, महिलांसाठी ६४ तर पुरुषांसाठी ३२ प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठीही या परिसरात विशेष सुविधा पुरविण्यात आली आहे.

Story img Loader