पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याचे उद्धघाटन करणार आहेत. या मेळाव्यात १० लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यादरम्यान नव्याने भरती झालेल्या ७५ हजार लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. या उमेदवारांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BYJU’S To Lay Off Employees: ‘बायजू’ अडीच हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, नेमकं कारण काय जाणून घ्या..

“युवकांना रोजगार पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे देशातील नागरिकांच्या विकासामध्ये हातभार लागणार आहे”, असे निवेदन या मेळाव्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. या मेळाव्याअंतर्गत पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार सर्व मंत्र्यांच्या खात्यातील मंजूर रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून निवडले गेलेले कर्मचारी सरकारच्या ३८ खात्यांमधील कार्यालयात नियुक्त केले जातील. या नियुक्तीसाठी ‘ग्रुप A’ (राजपत्रित), ‘ग्रुप B’ (अराजपत्रित) आणि ‘ग्रुप C’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Work From Home: कॅमेरा सुरू ठेवण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं, कंपनीला ठोठावला ६० लाखांचा दंड

केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान, सब इंस्पेक्टर, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक या पदांची भरती या मेळाव्यातून करण्यात येणार आहे. या नियुक्त्या मंत्रालयांकडून किंवा यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे बोर्डाकडून करण्यात येतील. दरम्यान, ‘ग्रुप A’ मध्ये (राजपत्रित) २३ हजार ५८४, ‘ग्रुप B’ मध्ये (राजपत्रित) २६ हजार २८२, ‘ग्रुप B’ (अराजपत्रित) मध्ये ९२ हजार ५२५ तर ‘ग्रुप C’ मध्ये तब्बल आठ लाख ३६ हजार रिक्त जागा आहेत. यातील एकट्या संरक्षण मंत्रालयात ३९ हजार ३६६ जागा रिक्त आहेत. रेल्वे मंत्रालयात दोन लाख ९१ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to launch recruitment drive for 10 lakh jobs will be held on october 22 by video conferencing rvs
Show comments