PM Modi To Send Chadar To Ajmer Sharif Dargah : ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या ८१३ व्या उरुस र्निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्याकडे पंतप्रधान मोदी औपचारिक चादर सुपूर्द करतील. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी दरवर्षी दर्ग्याला चादर पाठवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला दहा वेळा चादर अर्पण केली आहे. आता अकराव्या वेळी ते अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवणार आहेत. गेल्या वर्षी, ८१२ व्या उरुस निमित्त, पंतप्रधान मोदींच्या वतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जमाल सिद्दीकी यांच्यासह मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिष्टमंडळाने दर्ग्याला चादर अर्पण केली होती. ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याला (मझार-ए-अख्दास) चादर अर्पण करणे भक्ती आणि आदराचे प्रतीक आहे. उरुस दरम्यान चादर अर्पण करण्याची ही प्रथा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे.

अजमेर शरीफ दर्गा भारतातील सर्वाधिक मानल्या जाणार दर्ग्यांपैकी एक आहे. दरवर्षी, ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ उरुस उत्सव साजरा करण्यासाठी जगभरातील लाखो भाविक येथे येत असतात. हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरुस २८ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाला आहे.

उद्धव ठाकरेंनीही पाठवली चादर

अजमेर दर्गा शरीफ येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरूस सुरू होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चादर पाठवली होती. खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली होती.

हे ही वाचा : “पुरुषांनी शर्ट काढून मंदिरात जाणे वाईट”, शिवगिरी मठाच्या प्रमुखांची प्रथा बंद करण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांचाही पाठिंबा

बराक ओबामा, परवेझ मुशर्रफ यांनीही दिली होती भेट

अजमेरपासून सुरू होणाऱ्या सुफी कॉरिडॉरचे उद्दिष्ट हे देशभरातील सुफी देवस्थानं किंवा दर्गा यांना आधार देणे आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे. अजमेर दर्गा भारताच्या सांस्कृतिक कूटनीतीचाही एक भाग आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही दर्ग्यावर चादर अर्पण केली आहे. परवेझ मुशर्रफ, जनरल झिया-उल-हक, बेनझीर भुट्टो आणि शेख हसीना यांसारख्या नेत्यांसह शेजारील देशांतील इतर राजकीय नेत्यांनी देखील दर्ग्याला भेट दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to sends chadar to ajmer sharif dargah on 813th urs aam