पंतप्रधान मोदी यांचे जी २० परिषदेत आवाहन
नवी दिल्ली : अफगाणिस्तान हा मूलतत्त्ववाद आणि दहशतवादाचे केंद्र होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जी २० बैठकीत बोलताना केले.
अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठराव २५९३ वर आधारित एकत्रित आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज आहे, असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना करण्याच्या आवश्यकतेवरही मोदी यांनी भर दिला.
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जी २० परिषदेचे आयोजन केले आहे.
परिषदेतील भाषणानंतर मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील नागरिकांना मानवी दृष्टीकोनातून तातडीने विनाव्यत्यय मदत पुरविण्याचे आवाहन आपण केले आहे.