नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जी७ परिषदेला भेट दिली होती. आता ते ८ आणि ९ जुलै रोजी रशियाला भेट देणार असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी संवाद साधणार असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात मोदी आणि पुतिन द्वीपक्षीय संबंध आणखी बळकट करणे आणि विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील, अशी माहिती रशियाकडून देण्यात आली आहे.

रशियाच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि पुतिन हे जागतिक आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच दोन्ही देशातील द्वीपक्षीय संबंधावर चर्चा करतील. रशियानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाला भेट देतील. ४१ वर्षांतील भारतीय पंतप्रधानाचा हा पहिला दौरा आहे.

या भेटीचं महत्त्व काय?

युक्रेन-रशियाचे फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. मागच्या दोन वर्षात भारताने रशिया आणि युक्रेन यांच्याबाबत समतोल भूमिका घेतली होती.