पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवादही साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसा आहे अशोक स्तंभ?

संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाची उंची ६.५ मीटर असून हे कांस्यपासून बनवलेले आहे. तसेच या स्तंभाचे वजन ९ हजार ५०० किलो आहे. नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभ बांधण्यात आले आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार आहे.

सेंट्रल विस्टा अंदर्गत संसदेचे बांधकाम

सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत संसदेच्या नवीन इमारती सोबतच इंडिया गेटजवळ 10 अजून इमारती बांधल्या जाणार आहेत. ज्यामध्ये 51 मंत्रालयाची ऑफिस असणार आहेत. नवीन संसद बनवण्याचे काम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला देण्यात आले आहे.

सेट्रल विस्टाची गरज काय?

स्वतंत्र भारतात 1951 मध्ये निवडणूक झाली, त्यावेळी लोकसभेची सदस्य संख्या 489 होती. आजच्या स्थितीत लोकसभेची सदस्य संख्या 543 आणि राज्यसभा सदस्य संख्या 245 आहे. 2021 च्या प्रस्तावित जनगणनेनंतर ही संख्या वाढणार आहे. 2026 च्या परिसीमन नंतर वाढणाऱ्या संसद सदस्यांना बसण्यास सद्याच्या संसद भवनात जागा कमी पडेल. तसेच संसदेच्या जुन्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे नवीन ससंदेचे बांधकाम करण्यात आले आहे.

हेही वाचा – शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात; एकामागोमाग आठ गाड्यांची धडक