PM Narendra Modi US Visit LIVE Updates, 13 February 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर असून आज ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकन सरकारमधील काही उच्चपदस्थांच्या भेटी घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून सध्या भारतात मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या अनेक भारतीयांना विमानाने अत्यंत गैरसोयीत भारतात परत पाठवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
PM Modi US Visit 2025 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?
PM Modi in US: टेरिफ रेट टाळण्यासाठी भारत व अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करार होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यावेळी भारत व अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेकडून टेरिफ रेटसंदर्भात नव्याने निर्णय होण्याआधीच हा करार होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संबंधांचे राजकीय जाणाकार व्यक्त करत आहेत.
PM Modi US Visit: अमेरिकेत मोदींचा मुक्काम ऐतिहासिक ‘ब्लेअर हाऊस’मध्ये; काय आहे या वास्तूचं महत्त्व?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन डीसीमधील 'ब्लेअर हाऊस' या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुक्काम केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत आफ्रिकन-अमेरिकन गायिका-अभिनेत्री मेरी मिलबेन हिनं आनंद व्यक्त केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा अमेरिका दौऱ्यावर येत आहेत याचा आनंद आहे. याआधी ते २०२३ मध्ये आले होते. मी त्यावेळी जन गण मन गायले होते", असं मेरी मिलबेन हिनं एएनआयला सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतून भारतीयांना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "रेडिओ ही अनेकांसाठी कालसापेक्ष अशी लाईफलाईन ठरली आहे. माहितीसाठी, प्रोत्साहनासाठी आणि असंख्य लोकांना एकत्र जोडण्यासाठीही. बातम्या, संस्कृती, संगीत, कथा या सर्वच बाबतीत रेडिओकडून कलात्मक पद्धतीने गोष्टी हाताळल्या जातात. मी रेडिओशी संबंधित सर्वांना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा देतो", असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
PM Modi Donald Trump Joint Press Conference: पंतप्रधान मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. याआधी २०२३ मध्ये मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याबाबत मोठी चर्चा झाली होती.
ट्रम्प आणि पुतिन यांच्यत फोनवरुन चर्चा, युक्रेन युद्ध थांबणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वीचं धोरण बदलत बुधवारी हे सांगितलं की माझे समकक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पुतिन यांनी युद्ध कैद्यांची सुटका आणि युक्रेनशी युद्ध थांबवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. यासाठी ते चर्चा करायला तयार आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरु असलेलं युक्रेन रशिया युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे.
इथे वाचा सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रसिद्ध ब्लेअर हाऊसमध्ये मुक्काम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसवर भारताचा तिरंगा लावण्यात आला आहे. मोदी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर असून यात उच्चपदस्थांची ते भेट घेणार आहेत.
PM Modi - Donald Trump Visit: भारतात परत पाठवलेल्या नागरिकांच्या मुद्द्यावर चर्चा होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असून त्यावेळी नुकत्याच अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नुकतीच अशा १०४ भारतीयांची लष्कराच्या विमानाने हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेत भारतात परत पाठवणी केली. याव्यतिरिक्त आणखी ४८७ भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे.
PM Modi Warm Welcome in Washington DC: पंतप्रधान मोदींचं अमेरिकेत जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार ६ वाजेच्या सुमारास अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाले. यावेळी तेथील भारतीयांनी मोदींचं जंगी स्वागत केलं. याचे फोटो मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत.
PM Modi landed in US: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमेरिकेत आगमन झालं ते क्षण...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतरचे काही फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.
PM Modi meets Tulsi Gabbard: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुलसी गॅबार्ड यांच्या भेटीचे फोटो केले शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर तुलसी गॅबार्ड यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान काढलेले फोटो शेअर केले आहेत. तुलसी गॅबार्ड यांचं यावेळी गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोदींनी अभिनंदन केलं. तसेच, दोन्ही देशांमधील मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत कशी करता येईल, यावर चर्चा झाल्याचं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
PM Modi meets Tulsi Gabbard: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली तुलसी गॅबार्ड यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली आहे. दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अधिक सुलभ कसा करता येईल, यासंदर्भात यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची भेट (संग्रहीत छायाचित्र)