PM Narendra Modi US Visit Day 2 Highlights, 14 February 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा संपला असून ते लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या दौऱ्याच्या शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींनी भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी नियोजित कार्यक्रमानुसार संयुक्त पत्रकार परिषददेखील घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय परस्पर सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. त्याचवेळी भारताला F35 फायटर जेट पुरवण्याचा करार यावेळी अंतिम करण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी व ट्रम्प यांनी साधलेला संवाद!
याशिवाय अमेरिकेच्या टेरिफचा मुद्दा चर्चेत असताना उलट ‘भारतातले टेरिफ दर ही मोठी समस्या आहे’, असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केलं.
PM Modi US Visit 2025 Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा; नेमकं काय ठरलं?
Tahawwur Rana Extradition: देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
तहव्वूर राणा हा २६/११ मुंबई हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार होता. त्याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. मागे आम्ही ऑनलाईन पद्धतीने तहव्वूर राणाची साक्ष घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. न्यायालयानं त्यासंदर्भात निर्णयही दिला. पण भारतीयांची इच्छा होती की भारताविरोधात कट रचणारा, भारतावर हल्ला करणाऱ्याला भारताच्या स्वाधीन केलं जावं. अमेरिका त्यासाठी तयार नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनंतर राणाच्या प्रत्यार्पणाची परवानगी देण्यात आली आहे. भारतासाठी ही महत्त्वाची बाब आहे. आपल्या कायदाव्यवस्थेच्या माध्यमातूनच आपल्या अपराध्याला शिक्षा दिली जावी ही बाब आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे – देवेंद्र फडणवीस</p>
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “ब्रिक्स आता संपलंय”
BRICS च्या स्थापनेचा हेतूच वाईट होता. मी त्यांना बजावलं की जर तुम्ही डॉलरशी खेळण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यांच्यावर १०० टक्के टेरिफ लागू केलं जाईल. ज्या दिवशी ते असं म्हणतील की त्यांना या गोष्टी करायच्या आहेत. त्या दिवशी ते माघारी येतील आणि गयावया करतील – डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump’s Gift TO Modi: डोनाल्ड ट्रम्प यांचं मित्राला ‘स्पेशल गिफ्ट’, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं ‘हे’ पुस्तक!
PM Narendra Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना एक फोटोबुक भेट म्हणून दिलं आहे.
Elon Musk on PM Narendra Modi: एलॉन मस्क यांनी मोदींशी भेटीनंतर केली पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एलॉन मस्कशी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाल्यानंतर त्यासंदर्भात त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केली होती. त्यावर आता एलॉन मस्कनंदेखील पोस्ट केली आहे. “तुम्हाला भेटणं हा माझा मोठा सन्मान होता”, असं मस्कनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
It was an honor to meet https://t.co/WqELdGiurP
— Elon Musk (@elonmusk) February 14, 2025
PM Modi Meets Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच मोदींची गळाभेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट घेतली. यावेळी “वुई मिस यू” असं म्हणून ट्रम्प यांनी मोदींचं अभिवादन केलं.
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2025
Donald Trump on Tarrif : आयात शुल्काच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प ठामच, मोदींना भेटण्याआधीच केला भूमिकेचा पुनरुच्चार; म्हणाले, “जे देश आमच्यावर…”
आयात मालावरील शुल्कावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगातील अनेक राष्ट्रांना इशारा दिला आहे. यामुळे मित्र आणि स्पर्धक राष्ट्रांना फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापक परस्पर शुल्क करण्याची घोषणा केली आहे.
Tahawwur Rana : २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी ट्रम्प यांची मान्यता; मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मोठ्या घडामोडी
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला आणि भविष्यात आणखी प्रत्यार्पणाचे संकेत दिले.
Indian Tarrif on US : भारताने आकारलेले कर अमेरिकेसाठी मोठी समस्या; वित्तीय तूट भरून काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय!
अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कारवर ७० टक्क्याहून अधिक कर असल्याने अमेरिकेसाठी ती एक मोठी समस्या आहे. त्यामुळे भारतासोबतची अमेरिकेची व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी तेल आणि वायूची विक्री करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून ते तेथे विविध नेत्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.
“एलॉन मस्क जगातील महान पिता”, नरेंद्र मोदींनी शेअर केलेले ‘ते’ फोटो पाहून नेटकरी असं का म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर असून अमेरिकेत त्यांनी जगप्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एलॉन मस्क यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या तीन मुलांनाही आणलं होतं. त्यांच्या या कृतीने अवघ्या जगाचं लक्ष वेधलं असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
Modi Meets Trump in US: पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गळाभेट
ट्रम्प व मोदींची गळाभेट…
माझा दृढ विश्वास आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात आम्ही दोघांनी मिळून काम केलं त्यापेक्षा दुप्पट वेगानं त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आम्ही काम करू – नरेंद्र मोदी
I firmly believe with Trump during next four years in his 2nd term, we will work with twice the speed that we did in his 1st term: Modi. pic.twitter.com/yjBPKIoCHb
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
PM Narendra Modi: ट्रम्प यांच्यासमोरच पंतप्रधान मोदींना गौतम अदाणींबाबत प्रश्न, मोदी म्हणाले, “अशा वैयक्तिक मुद्द्यांवर…”
PM Narendra Modi US Visit: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान आज पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठक झाली असून, यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि करार झाले आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारण्यात आले होते.
Modi-Trump Meet: F35 Jets ते जगातील सर्वात मोठा ट्रेड रूट, मोदी-ट्रम्प भेटीतील ५ महत्त्वाचे मुद्दे
Narendra Modi- Donald Trump Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांची आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून, विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. बैठकीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली असून, ते संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा…
Donald Trump after Meeting with Modi: भारत अमेरिकेकडून कच्चं तेल व नैसर्गिक वायूची खरेदी करणार
आमच्याकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त तेल आणि नैसर्गिक वायू आहे आणि भारताला त्याची गरज आहे. त्यामुळे भारत येत्या काळात आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणार आहे – डोनाल्ड ट्रम्प
निवडणुकीतील तुमच्या यशासाठी मी १४० कोटी भारतीयांकडून तुमचं अभिनंदन करतो. याचदरम्यान भारतातील लोकांनीदेखील एका व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान म्हणून सेवा करण्यासाठी निवडलं हा योगायोगच म्हणावा लागेल. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की यामुळे मला पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे – नरेंद्र मोदी
बैठकीआधी व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं स्वागत करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्हाला तुमची फार आठवण येत होती”!
https://twitter.com/PTI_News/status/1890169498650702007
/eयावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली…
भारत व अमेरिकेत एक वेगळ्या प्रकारा बाँड आहे.. जगातली सर्वात जुनी आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही – डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump on Military Trade to India: भारताला लष्करी साहित्य निर्यात करण्यासंदर्भात ट्रम्प यांची भूमिका
याच वर्षापासून भारताला निर्यात होणाऱ्या लष्करी साहित्यामध्ये आम्ही हजारो कोटींच्या विक्री स्वरूपात वाढ करणार आहोत – डोनाल्ड ट्रम्प
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दिला असून त्यासंदर्भात मोदींशी भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
“हा मुद्दा फक्त भारताशी संबंधित नाही. इतर देशांमध्येही जे लोक बेकायदेशीररीत्या राहात आहेत, त्यांच्याशी संबंधितदेखील आहे. या लोकांना त्या देशांमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आम्ही कायम हेच सांगत आलो आहोत की अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या आपल्या नागरिकांना परत घेण्यास भारत तयार आहे. पण हे सर्व लोक सामान्य कुटुंबांमधले असून त्यांना फसवून अमेरिकेला नेण्यात आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेविरोधातच आपण पावलं उचलण्याची गरज आहे”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर मांडली.
VIDEO | In response to query by PTI regarding illegal immigrants, PM Modi (@narendramodi) says, "This question is not just for India, but those who live in other countries illegally; they don't have a right to stay there. We have always said that India is ready to take back its… pic.twitter.com/9JAHqbekmL
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
अमेरिकेचं आण्विक तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी भारत सरकार त्यांच्या कायद्यांमध्ये बदल करत आहे – डोनाल्ड ट्रम्प
India is reforming its laws to welcome US nuclear technologies into Indian market: President Trump. pic.twitter.com/ogTZV1tahJ
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
“जर मी त्या काळात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर रशियानं युक्रेनसंदर्भात जे काही केलं, ते झालं नसतं. माझ्या आधीच्या कार्यकाळात ते घडलंही नाही. रशियानं युक्रेनचा खूप मोठा हिस्सा ताब्यात घेतला आहे. आता हे थांबायला हवं”, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
VIDEO | In response to a query related to Ukraine and Russia, US President Donald Trump (@realDonaldTrump) says: "Russia has gotten themselves into something that I would say, if I was the President, it would not have happened; and it didn't happen for four years… I think when… pic.twitter.com/Tmyzkyyeki
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
अदाणी लाच प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वॉशिंग्टन डीसीमधील पत्रकार परिषदेत मोठं विधान! “दोन देशांमधले दोन महत्त्वाचे नेते अशा वैयक्तिक प्रकरणांची चर्चा करत नाहीत”, असं म्हणत मांडली भूमिका!
VIDEO | In response to a query regarding industrialist Gautam Adani, PM Modi (@narendramodi) says: "First of all, India is a democratic country and our culture is 'Vasudhaiva Kutumbakam'. We treat the world as a family, and I treat every Indian as one of my own. Secondly, leaders… pic.twitter.com/ZGzlrUi0SI
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
PM Modi on Ukrain War: युक्रेन युद्धात भारत तटस्थ नाही, आम्ही शांततेच्या बाजूने – मोदी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन युद्धाबाबत भूमिका मांडली. “युक्रेन युद्धाबाबत भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने उभा आहे”, असं मोदी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाटाघाटी करण्यामध्ये माझ्यापेक्षाही कट्टर आहेत. या बाबतीत मी त्यांच्या आसपासही नाही – डोनाल्ड ट्रम्प
VIDEO | In response to a query regarding him calling PM Modi a 'tough negotiator', US President Donald Trump says: "He is a much tougher negotiator than me, and he is a much better negotiator than me. There is not even a contest."#ModiInUS pic.twitter.com/9s4JkguTqf
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी लिहिलेलं ‘अवर जर्नी टुगेदर’ हे पुस्तक भेट म्हणून दिलं
“राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमी MAGA बद्दल बोलत असतात. भारतात आपण विकसित भारतच्या दिशेनं प्रयत्न करत आहोत. यालाच अमेरिकेच्या संदर्भात MAGA म्हणतात. त्यामुळे भारत व अमेरिका यांच्यात या MAGA च्याच स्वरूपात समृद्धीची वेगळी भागीदारी आहे”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये दिली आहे.
PM Modi Meets Donald Trump – मोदींनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; टेरिफ दर, व्यापार सबंध याबाबत द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दोऱ्यावेळी टेस्ला कार बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली.
Watch: Prime Minister Narendra Modi meets Tesla CEO Elon Musk pic.twitter.com/TKfRLFyFrf
— IANS (@ians_india) February 13, 2025
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय बैठकीसाठी वॉशिंग्टन डीसी येथील ब्लेअर हाऊस येथे पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची भेट (संग्रहीत छायाचित्र)