PM Narendra Modi US Visit Day 2 Highlights, 14 February 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा अमेरिका दौरा संपला असून ते लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या दौऱ्याच्या शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींनी भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी नियोजित कार्यक्रमानुसार संयुक्त पत्रकार परिषददेखील घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय परस्पर सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. त्याचवेळी भारताला F35 फायटर जेट पुरवण्याचा करार यावेळी अंतिम करण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी व ट्रम्प यांनी साधलेला संवाद!

याशिवाय अमेरिकेच्या टेरिफचा मुद्दा चर्चेत असताना उलट ‘भारतातले टेरिफ दर ही मोठी समस्या आहे’, असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केलं.

Live Updates

PM Modi US Visit 2025 Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा; नेमकं काय ठरलं?

21:13 (IST) 13 Feb 2025
ट्रम्प यांना भारताचे पंतप्रधान मोदींबरोबरच्या त्यांच्या नात्याचा अभिमान, व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती

“आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताचे पंतप्रधान मोदी यांचे अधिकृत भेट घेतील. यामध्ये द्विपक्षीय बैठक, संयुक्त पत्रकार परिषद आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश असेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींबरोबरच्या त्यांच्या जवळच्या नात्याचा आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. ते दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्यास उत्सुक आहेत,” अशी माहिती व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

https://platform.twitter.com/widgets.js
20:41 (IST) 13 Feb 2025
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती

पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अमेरिकन प्रशासनाची काय चर्चा झाली याबद्दल माहिती समोर आली आहे. व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारबरोबर झालेल्या आजच्या बैठकीत गेल्या ट्रम्प प्रशासनाच्या कामगिरीमध्ये भर टाकली जाईल आणि दोन्ही नेते संरक्षण, व्यापार, ऊर्जा पायाभूत सुविधा, प्रादेशिक भागीदारी या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील. भारताला संरक्षण क्षेत्रातील विक्री वाढविण्याबाबत, तसेच त्यांच्याकडून अमेरिकन तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य दिले जात असल्याबद्दल लक्ष ठेवले जात आहे. यासह जगाच्या इतर भागांमध्ये अमेरिकन ऊर्जा पोहोचवण्यावर देखील राष्ट्राध्यक्ष लक्ष केंद्रित करत आहेत. याबरोबरच ते भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अमेरिकेच्या नैसर्गिक संसाधनांचा प्रमुख आयातदार म्हणून भारताला प्राधान्य देतील.”

https://platform.twitter.com/widgets.js
17:36 (IST) 13 Feb 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार एलॉन मस्क यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ फेब्रुवारी) अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js
16:32 (IST) 13 Feb 2025

PM Modi Donald Trump Visit: काँग्रेसचे मोदींना पाच प्रश्न…

अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या मोदींना काँग्रेसकडून नेते जयराम रमेश यांनी प्रश्न केले आहेत…

१. भारतीय नागरिकांना अमेरिकेतून परत पाठवल्याच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त करण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे का?

२. मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना हे सांगू शकतील का की भविष्यात भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी व्हेनेझुएला आणि कोलंबियाप्रमाणे स्वत:चं विमान पाठवेल?

३. गाझा ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेनं जाहीर केलेल्या अजब भूमिकेवर मोदी भारताची पॅलेस्टाईनबाबतची दीर्घकालीन भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर आक्षेप नोंदवतील का?

४. मोदी ट्रम्प यांना हे सांगू शकतील का की पॅरिस जलवायू करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेचं बाहेर पडणं हे फक्त ट्रम्प यांच्याकडून जागतिक जबाबदारीबाबत हात झटकणं आहे?

५. मोदी ट्रम्प यांना हे सांगू शकतील का की एच वन बी व्हिसाधारक भारतीय तरुणांवर अमेरिकेत होत असलेले वंशभेदी हल्ले भारताला स्वीकार्य नाहीत. एचवनबी व्हिसा दोन्ही देशांसाठी फायदेशीर असून तो चालू ठेवला पाहिजे.

14:23 (IST) 13 Feb 2025
PM Modi US Visit : ब्लेअर हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत

ब्लेअर हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत!

https://twitter.com/PTI_News/status/1889831549413236805

14:18 (IST) 13 Feb 2025

Modi in US: मोदींचा अमेरिका दौरा भारतासाठी किती महत्त्वाचा? ट्रम्प यांच्याशी कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा?

PM modi us visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १३ फेब्रुवारीला मोदी अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला अमेरिका दौरा असणार आहे.

वाचा सविस्तर

12:07 (IST) 13 Feb 2025
PM Modi in US: टेरिफ रेट टाळण्यासाठी भारत व अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करार होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यावेळी भारत व अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेकडून टेरिफ रेटसंदर्भात नव्याने निर्णय होण्याआधीच हा करार होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संबंधांचे राजकीय जाणाकार व्यक्त करत आहेत.

12:00 (IST) 13 Feb 2025

PM Modi US Visit: अमेरिकेत मोदींचा मुक्काम ऐतिहासिक ‘ब्लेअर हाऊस’मध्ये; काय आहे या वास्तूचं महत्त्व?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन डीसीमधील ‘ब्लेअर हाऊस’ या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुक्काम केला.

वाचा सविस्तर

10:59 (IST) 13 Feb 2025
Mary Millben on PM Modi US Visit: मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर गायिका मेरी मिलबेनची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत आफ्रिकन-अमेरिकन गायिका-अभिनेत्री मेरी मिलबेन हिनं आनंद व्यक्त केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा अमेरिका दौऱ्यावर येत आहेत याचा आनंद आहे. याआधी ते २०२३ मध्ये आले होते. मी त्यावेळी जन गण मन गायले होते”, असं मेरी मिलबेन हिनं एएनआयला सांगितलं.

10:16 (IST) 13 Feb 2025
PM Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतून दिल्या देशवासीयांना शुभेच्छा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतून भारतीयांना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “रेडिओ ही अनेकांसाठी कालसापेक्ष अशी लाईफलाईन ठरली आहे. माहितीसाठी, प्रोत्साहनासाठी आणि असंख्य लोकांना एकत्र जोडण्यासाठीही. बातम्या, संस्कृती, संगीत, कथा या सर्वच बाबतीत रेडिओकडून कलात्मक पद्धतीने गोष्टी हाताळल्या जातात. मी रेडिओशी संबंधित सर्वांना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा देतो”, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

09:53 (IST) 13 Feb 2025

PM Modi Donald Trump Joint Press Conference: पंतप्रधान मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. याआधी २०२३ मध्ये मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याबाबत मोठी चर्चा झाली होती.

09:17 (IST) 13 Feb 2025

ट्रम्प आणि पुतिन यांच्यत फोनवरुन चर्चा, युक्रेन युद्ध थांबणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वीचं धोरण बदलत बुधवारी हे सांगितलं की माझे समकक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पुतिन यांनी युद्ध कैद्यांची सुटका आणि युक्रेनशी युद्ध थांबवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. यासाठी ते चर्चा करायला तयार आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरु असलेलं युक्रेन रशिया युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे.

इथे वाचा सविस्तर वृत्त

09:05 (IST) 13 Feb 2025
PM Modi Stays in Blair House: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्लेअर हाऊसमध्ये मुक्काम

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रसिद्ध ब्लेअर हाऊसमध्ये मुक्काम

08:59 (IST) 13 Feb 2025
PM Modi in US: अमेरिकेच्या ब्लेअर हाऊसवर भारतीय तिरंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसवर भारताचा तिरंगा लावण्यात आला आहे. मोदी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर असून यात उच्चपदस्थांची ते भेट घेणार आहेत.

08:57 (IST) 13 Feb 2025

PM Modi – Donald Trump Visit: भारतात परत पाठवलेल्या नागरिकांच्या मुद्द्यावर चर्चा होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असून त्यावेळी नुकत्याच अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नुकतीच अशा १०४ भारतीयांची लष्कराच्या विमानाने हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेत भारतात परत पाठवणी केली. याव्यतिरिक्त आणखी ४८७ भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे.

08:54 (IST) 13 Feb 2025

PM Modi Warm Welcome in Washington DC: पंतप्रधान मोदींचं अमेरिकेत जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार ६ वाजेच्या सुमारास अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाले. यावेळी तेथील भारतीयांनी मोदींचं जंगी स्वागत केलं. याचे फोटो मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत.

https://twitter.com/narendramodi/status/1889835452850643077

08:38 (IST) 13 Feb 2025

PM Modi landed in US: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमेरिकेत आगमन झालं ते क्षण…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतरचे काही फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

08:37 (IST) 13 Feb 2025

PM Modi meets Tulsi Gabbard: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुलसी गॅबार्ड यांच्या भेटीचे फोटो केले शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर तुलसी गॅबार्ड यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान काढलेले फोटो शेअर केले आहेत. तुलसी गॅबार्ड यांचं यावेळी गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोदींनी अभिनंदन केलं. तसेच, दोन्ही देशांमधील मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत कशी करता येईल, यावर चर्चा झाल्याचं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

08:35 (IST) 13 Feb 2025

PM Modi meets Tulsi Gabbard: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली तुलसी गॅबार्ड यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली आहे. दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अधिक सुलभ कसा करता येईल, यासंदर्भात यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची भेट (संग्रहीत छायाचित्र)

PM Narendra Modi US Visit Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर!