PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. तसेच ते ‘क्वाड’ राष्ट्रांच्या वार्षिक शिखर परिषदेतही सहभागी झाले आहेत. याबरोबरच ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही भाषण करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना अमेरिकेतील भारताचे राजदूत आणि माजी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या भेटीचा एक जुना किस्सा शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी २०१४ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काय संभाषण झाले होते? याबाबतचा एक किस्सा विनय क्वात्रा यांनी सांगितला. विनय क्वात्रा म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात औपचारिक चर्चा संपली. त्यानंतर ते ओबामा यांच्या लिमोझिन या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणाहून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्टिन ल्यूथर किंग मेमोरियलकडे रवाना झाले होते. त्यावेळी मी गाडीमध्ये अनुवादक म्हणून उपस्थित होतो. या १० मिनिटांच्या भेटीच्या दरम्यान बराक ओबामा यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या आई-वडिलांसह कुटुंबाबद्दल विचारले होते.”

donald trump and joe biden meet at the white house
ट्रम्प-बायडेन यांच्यात दोन तास चर्चा; सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही, ‘व्हाइट हाऊस’चे निवेदन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Donald Trump
Donald Trump : एलॉन मस्क, विवेक रामास्वामींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश; करणार नोकरशाहीची साफसफाई
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
s jaishankar on donald trump us president
“आम्हाला अमेरिकेची चिंता नाही”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका; म्हणाले, “ट्रम्प यांनी उचललेल्या पहिल्या तीन कॉलमध्ये…”!

हेही वाचा : PM Narendra Modi : “जगात तणाव आणि संघर्ष उद्भवला असताना…”; क्वाड शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका!

विनय क्वात्रा यांनी सांगितलं की, “बराक ओबामा यांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी काहीसं स्मितहास्य केलं आणि म्हणाले, ‘मी जे तुम्हाला सांगत आहे, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे की, तुमच्या गाडीमधील जागा जितकी मोठी आहे, जिथे आता आपण बसलो आहोत. तेवढ्याच आकाराच्या घरात माझी आई राहते.’ दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे हे शब्द ऐकून बराक ओबामा (Barack Obama) यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण मोदींच्या उत्तरानंतर ओबामा यांना मोदींच्या आयुष्यातील संघर्ष दिसला”, असं विनय क्वात्रा यांनी सांगितलं.

दरम्यान, विनय क्वात्रा यांनी पुढे सांगितलं की, “माझ्या वैयक्तिक अनुभवावरून या संभाषणानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जे संबंध निर्माण झाले ते प्रामाणिकपणावर आधारित होते. कारण बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदी हे दोघेही नम्र परिस्थितीतून एका संघर्षामधून पुढे येऊन देशाचे नेतृत्व करत आहेत. तसेच २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा चर्चेत होता”, असं विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितलं. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त द ट्रिब्यूनने दिले आहे.