करोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे असंही ते म्हणाले आहेत.
वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान पद्दतीत बदल होत असून नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं सांगितलं. करोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आभार मानले आहेत. तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.
Weather patterns are changing, glaciers are melting, rivers and forests are in danger.
We cannot let our planet remain wounded.
– PM @narendramodi
— BJP (@BJP4India) May 26, 2021
पुढे ते म्हणाले की, “गौतम बुद्ध यांचं जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेलं होतं. पण आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं गरजेचं आहे”.
PM Shri @narendramodi‘s keynote address on the occasion of Virtual Vesak Global Celebrations on Buddha Purnima.
https://t.co/OTuWEwMIWx— BJP (@BJP4India) May 26, 2021
“करोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. करोनानंतरचं जग आत्तासारखं अजिबात नसेल. आगामी काळात करोनाआधी आणि करोनानंतर अशीच चर्चा असेल. पण गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदलही घडले आहेत. आता आपल्याला करोनाची चांगली ओळख झाली असून त्याच्याविरोधाच लढण्याचं धोरण आखू शकतो. तसंच आपल्याकडे लस असून जीव वाचवण्यासाठी आणि करोनाचा पराभव करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. करोना आल्यानंतर वर्षभरात लस येणं हा मानवी दृढनिश्चय दाखवतं. भारताला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, ज्यांनी लसनिर्मितीसाठी काम केलं,” अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.
Our planet will not be the same after COVID-19.
We now have a better understanding of the pandemic now. We have the vaccine. India is proud of our scientists.
– PM @narendramodi pic.twitter.com/SfpTCMy1Nw
— BJP (@BJP4India) May 26, 2021
नरेंद्र मोदींनी यावेळी पुन्हा एकदा पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक यांचा उल्लेख करत सलाम केला. मोदींनी यावेळी बुद्धाने आपल्याला जीवनशैली आणि निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली असल्याचं म्हटलं आहे.