भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अडवानी यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे.
मोदींनी अडवाणी यांची भेट तर घेतलीचं पण त्यांनी याविषयी ट्विटदेखील केले आहे. ‘आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक असलेल्या अडवानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. ज्ञान व चारित्र्यसंपन्नता असलेला मनुष्य म्हणून त्यांची ओळख आहे. मला त्यांच्याकडून वैयक्तिकदृष्ट्या खूप काही शिकावयास मिळाले आहे. ते एक उत्तम शिक्षक व नि:स्वार्थी सेवेचे सर्वोच्च उदाहरण आहेत,’ असे  ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आडवाणी व मोदींमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त होते. मात्र, मोदींनी अडवाणींच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम बसण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा