गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत १३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आज या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदी त्यांनी मोरबी दुर्घटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा – “तुरुंगात सुरक्षित राहण्यासाठी ‘आप’च्या नेत्याला १० कोटी दिले”, सुकेश चंद्रशेखरच्या दाव्याने खळबळ

रविवारी ( ३० ऑक्टोबर ) संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी होते. या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ओरेव्हा कंपनीच्या मॅनेजरसह तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि पुलाचे व्यवस्थापन करण्याऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राजकोट पोलिसांनी दिली होती.

Story img Loader