सध्या आपल्याला कशा प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत काय, अशी माहितीच्या अधिकारात विचारणा करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी मेहसाणाच्या पोलिसांना सोमवारी पाठविले.
मेहसाणाचे पोलीस अधीक्षक जे.आर. मोठालिया यांनी यास दुजोरा देताना जशोदाबेन यांनी आपल्याला तसे पत्र दिल्याचे सांगितले. सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्दय़ावरून पंतप्रधानांची पत्नी म्हणून आपले काय अधिकार आहेत, हे जाणून घ्यावयाचे आहे, असे त्यांनी आपल्याला या पत्रान्वये विचारले असून विशिष्ट कालावधीत त्यांच्या पत्रास विस्तृत उत्तर दिले जाईल, असे मोठालिया यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांची पत्नी म्हणून आपल्याला मिळणाऱ्या सुरक्षा कवचासंबंधी भारतीय घटनेतील तरतुदी आणि कायद्यांची माहिती द्यावी तसेच आपल्याला देण्यात येणाऱ्या संरक्षणासंबंधी पोलीस विभागाकडून विविध दस्तावेजांच्या प्रति द्याव्यात, अशी मागणी जशोदाबेन यांनी केली आहे.
जशोदाबेन या मेहसाणा जिल्ह्य़ातील उंझा या शहरात आपले बंधू अशोक मोदी यांच्यासमवेत राहात असून, मोदी यांचा पंतप्रधानपदी शपथविधी झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.
सुरक्षा कवचासंबंधी जशोदाबेन यांच्याकडून विचारणा
सध्या आपल्याला कशा प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत काय, अशी माहितीच्या अधिकारात विचारणा करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी मेहसाणाच्या पोलिसांना सोमवारी पाठविले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modis wife files rti request in gujarat what services security am i entitled to