‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून वाद सुरू असताना भाजपाकडून सातत्याने या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन केलं जात आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चित्रपटावर बोलले आहेत. नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे.

हे ही वाचा >> “शरद पवार नसतील तर…”, राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबाबत एकनाथ खडसेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, “चर्चेत…”

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी मागल्या दाराने राजकीय सौदेबाजी देखील करत आहे. म्हणूनच कर्नाटकमधील लोकांनी या काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला असं काही करताना पाहतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm nrendra modi on the kerala story controversy attacks congress karnataka elections asc
Show comments