नियोजन आयोगाच्या कार्यालयाबाहेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मित्रा यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर चिडलेल्या बॅनर्जी यांचा राग अजून शांत झालेला नाही.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतरही बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर असलेला राग अद्याप कायम आहे. बॅनर्जी यांनी पंतप्रधानासोबतची बैठक मंगळवारी संध्याकाळी रद्द केली. त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत त्यांची बुधवारी नियोजित असलेली बैठकही रद्द करण्यात आली. चिडलेल्या बॅनर्जी तातडीने कोलकात्याला रवाना झाल्या आहेत.
नियोजन आयोगाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी मित्रा यांना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. आंदोलकांनी त्यांचा कुर्ताही फाडला. या प्रकारानंतर ममता बॅनर्जी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंह अहलुवालिया यांच्यावर भडकल्या. अपुऱया सुरक्षाव्यवस्थावरही त्यांनी टीका केली.
मित्रा यांना मंगळवारी संध्याकाळी ‘एम्स’मध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर बॅनर्जी यांच्या कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाला फोनवरून ममता बॅनर्जी यांचा रक्तदाब कमी झाल्याचे सांगून पंतप्रधानांसोबतच्या नियोजित बैठकीला त्या येऊ शकणार नसल्याचे कळवले. पंतप्रधानांनी स्वतः बॅनर्जी यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केल्याचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा