पाकिस्तानची संरक्षण विषयक समितीची पहिली बैठक नवनिर्वाचित पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अध्यतेखाली नुकतीच पार पडली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढता तणाव हा समितीच्या बैठकीतील मुख्य मुद्दा होता.पाकिस्तानातील अंतर्गत तसेच पाकिस्तानच्या सीमांवरील अशांत परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. दहशतवादाविरोधातील पाकिस्तानची भूमिका नेमकी काय असावी याबाबतही खल झाला. बैठकीस अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. भारतीय सीमेवरील वाढता तणाव आणि परराष्ट्र धोरणातील त्रुटींवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडेच परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण खाते आहे. शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे.

Story img Loader