महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पंतप्रधानांनी भेट द्या आणि दयनीय अवस्था असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नसून भ्रष्टाचाराचा आरोप करत जलसंपदा विभागात भ्रष्टाचार झाला नसता तर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीच नसता असा दावा त्यांनी केला.
 शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य शासनाची इच्छाशक्तीचम्हणाले, जमिनीतील पाण्याची पातळी खालावत असून हे भीषण संकट आहे. देशात जलसंकट निर्माण झाले असून पंतप्रधानांनी दुष्काळी प्रश्नात तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकारी मदत व कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी एक निपक्ष व स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.  
चारा छावण्यांसाठी शासकीय निधी न दिल्यास ८ एप्रिलपासून औरंगाबाद येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा लोकसभेतील भाजपचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केले. केंद्राने पाच हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली. तर मुंडे यांच्या उपोषणाला सरकार बधले नाही तर त्यांच्यासोबत आपणही उपोषणाला बसू असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.   
दुष्काळी चारा छावणीवर भोजन
राजनाथ सिंह यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत असताना सोमवारी जनावरांच्या चारा छावणीवरच दुपारचे भोजन घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि शासकीय अधिकारी त्यांच्यासोबत आले होते त्यामुळे बावरून गेलेल्या शेतकऱ्यांसमवेत राजनाथ सिंह यांनी तेव्हा संवादच साधला नाही तर झुणका भाकरी आणि वांग्याचे भरीत, ठेचा असा गावरान बेत घेतला.

Story img Loader