ऐझॉल- मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचारमोहिमा हाती घेणार आहेत. या ४० सदस्यीय विधानसभेसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सोनिया गांधी १८ नोव्हेंबर रोजी या राज्याच्या दौऱ्यावर असून, दक्षिण मिझोरममधील लुंग्लेई येथे त्या जनतेला संबोधित करणार आहेत. राहुल गांधी २१ नोव्हेंबरला मिझोरममध्ये येणार असून, मिझोरम-म्यानमार सीमेवर चंफाई शहरात आणि मिझोरम-आसाम सीमेवर कोलासिब येथे त्यांच्या सभा होणार आहेत.

Story img Loader