येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर, १४ फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथेही एका हिंदू मंदिराचं उद्घाटनासाठी मोदींना बोलावण्यात आलं आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशी थरूर यांनी एक्सवर पोस्ट लिहित मोदींना उद्देशून टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर आणि १४ फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर लवकरच निवडणुका होतील अशी माझी अपेक्षा आहे. २००९ मध्ये गुजरात इंक.चे CEO, भारतीय मतदारांना आर्थिक विकासाचा अवतार म्हणून मोदींना विकले गेले. नोटबंदीनंतर मोदींविरोधात वातावरण तयार झालं होतं. परंतु, पुलवामा हल्ल्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांचं राष्ट्रीय सुरक्षा निवडणुकीत रुपांतर झालं. २०२४ मध्ये, हे स्पष्ट आहे की भाजपा आता आपल्या मूळ संदेशाकडे परत येईल आणि नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट म्हणून देशासमोर सादर करतील.

हेही वाचा >> “राज ठाकरे हिंदू शेर, त्यांनी अयोध्येला..”; हनुमान गढीचे महंत राजूदास यांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक

“अच्छे दिनचे काय झाले? वर्षाला २ कोटी नोकऱ्यांचे काय झाले? आर्थिक वाढीचे काय झाले, ज्यामुळे सामाजिक-आर्थिक पातळीवर खालच्या भागांना फायदा होईल. प्रत्येक भारतीयाच्या खिशात आणि बँक खात्यात डिस्पोजेबल उत्पन्न टाकण्याचे काय झाले? असे प्रश्न सर्व विचारतात. हिंदुत्व विरुद्ध लोककल्याण असा आकार घेणाऱ्या निवडणुकीत या प्रश्नांवर चर्चा करावी लागेल, असंही शशी थरूर म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक समारंभाच्या आधी, पंतप्रधान मोदी ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानक यांचा समावेश आहे. दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत यांना हिरवा झेंडा दाखविण्यात येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm will be presented as hindu hriday samrat in 2024 shashi tharoors dig at bjp sgk