पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर केली आहे. यासोबतच अन्य १० मंत्र्यांच्या संपत्तीचा तपशीलही सार्वजनिक करण्यात आला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीत २६.१३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच पीएम मोदी यांच्या नावे गुजरातमध्ये एका निवासी भूखंडही आहे.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराआधी शिवसेना खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…”

मार्च २०२१ अखेर पंतप्रधान मोदींची चल संपत्ती १,९७,६८,८८५ रुपये होती. ती मार्च २०२२ अखेरीस २,२३,८२,५०४ रुपये इतकी वाढली आहे. यामध्ये मुदत ठेवी, बँकेतील शिल्लक, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, जीवन विमा पॉलिसी, दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नावावर गुजरामध्ये एक निवासी भुखंड आहे. गुजरातच्या गांधीनगरमध्ये रिअल इस्टेट सर्व्हे क्रमांक ४०१/अ या भुखंडात तिघांची मालकी असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहेत. यात प्रत्येक जण २५ टक्के भागीदार आहेत. तसेच उर्वरित २५ टक्के भाग दान करण्यात आला आहे. या भुखंडाचे बाजार मुल्य १.१० कोटी रुपये आहे.

हेही वाचा – मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले “अधिवेशन… ”

दरम्यान, पंतप्रधान कार्यालायाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर १० मंत्र्यांची संपत्तीही सार्वजनिक करण्यात आली आहे. यामध्ये राजनाथ सिंह, आरके सिंग, धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी, जी किशन रेड्डी, ज्योतिरादित्य सिंधिया, पुरुषोत्तम रुपाला, व्ही मुरलीधरन, फगन सिंग कुलस्ते यांचाही समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची चल संपत्ती मार्च २०२२ मध्ये २.२४ कोटी होती, ती आता २.५४ कोटी झाली आहे, तर स्थावर संपत्ती २.९७ कोटी होती, ती तेवढीच आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची चल संपत्ती ३५.६३ कोटी आहेत, तर त्यांची पत्नी प्रियदर्शिनी सिंधिया यांच्या नावे १४.३० लाख रुपयांची संपत्ती आहे. सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे एकूण १.४३ कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ८.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे एकूण १.८३ कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर २.९२ कोटींची संपत्ती आहे. पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची एकूण संपत्ती ७.२९ कोटी रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी सविताबेन रुपाला यांच्या नावावर ५.५९ कोटींची संपत्ती आहे.

Story img Loader