पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने देशातील लाखोंची गरिबी दूर केली असे पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीचे स्तुतीपर वक्तव्य यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. त्या दिल्लीतील ‘राजीव गांधी विकास अध्ययन संस्थे’च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होत्या.
सोनिया गांधी म्हणाल्या, “देशाची प्रगती साधणे हेच यूपीए सरकारचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. ही संस्था म्हणजे राजीव गांधी आणि ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या माध्यमातून देशाला पुढे घेऊन जाणारे तरूण नेतृत्व निर्माण व्हावे याकडे संस्थेने लक्ष देणे गरजेचे आहे”. तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर या संस्थेने भर द्यावा असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
‘पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांमुळे लाखोंची गरिबी दूर’
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने देशातील लाखोंची गरिबी दूर केली असे पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीचे स्तुतीपर
Updated:
First published on: 30-09-2013 at 11:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pms schemes have lifted millions out of poverty sonia