कॅलिफोर्निया पोलिसांनी एका पिस्ता चोराला अटक केली आहे. १९ हजार किलो पिस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. दरम्यान, चोरी आणि विक्रीच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. चोरी केलेला पिस्ता एक लाख डॉलर्सला विकण्यापूर्वीच आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
चोरी झालेला पिस्ता जवळच्याच एका पार्किंग क्षेत्रात सापडला होता आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सापडला, असे शनिवारी तुलार परिसरातील शेरीफच्या कार्यालयाने घोषित केले. या महिन्याच्या सुरुवातीस सेंट्रल कॅलिफोर्नियास्थित पिस्ता कंपनीच्या नित्याच्या ऑडिटमध्ये पिस्ता गायब झाल्याची माहिती समोर आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना १९ हजार किलो पिस्ता हरवल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करत एकाला अटक केली आहे.
हेही वाचा- VIDEO: पाहा १८ हजार किलोचा वजनाचा बॉम्ब समुद्रात फुटतो तेव्हा काय होतं
चोराची पिस्ता लहान पिशव्यांमध्ये पुन्हा विकण्याची योजना होती. तपासादरम्यान, ३४ वर्षीय ट्रक चालक अल्बर्ट माँटेमॉयोर याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात सामील असलेल्या सरकारी संस्थांनी पिस्ता चोरीसंदर्भात सर्व माहिती देण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये ठेवलेला पिस्ता टस्स्टोन कंपनीला परत करण्यात आला आहे.