‘आयसिस’शी संबंधित ऑनलाइन कारवाया करणाऱ्या भटकळमधील (कर्नाटक) एका ३३ वर्षीय युवकाला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अदनान हुसेन दामुदी असे त्याचे नाव असून तो ‘सिमी’चा माजी सदस्य आहे. कामानिमित्त तो २०१२ मध्ये दुबईला गेला होता. ‘आयसिस’साठी ऑनलाइन भरती करण्याचे काम तो करीत होता.
दुबईतील जागतिक व्यापार केंद्रात तो काम करीत होता आणि त्याला लवकरच भारतात पाठविले जाणार आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली असून सध्याचा त्याचा ठावठिकाणा महिती नाही. त्याला पकडण्यात आल्यापासून त्याच्या ऑनलाइन कारवाया थंडावल्याचे निदर्शनास आले आहे. ट्विटरवरून तो आयसिसच्या विचारसरणीचा प्रचार करीत असे. हैदराबादमधील युवकांची आयसिसमध्ये भरती करण्याच्या प्रकरणाची चौकशी करीत असताना तेलंगण पोलिसांना दामुदीचे आयसिसशी संबंध असल्याचे उघड झाले.