काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा चेहरा ‘मॉर्फ’ केलेला एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. बिपिन कुमार सिंह असं या आरोपीचं नाव आहे. राजस्थानमधील प्रतापगड पोलिसांनी ही कारवाई केली.
लता शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला १४ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रतापगडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार म्हणाले, “सोनिया गांधी यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओची ट्विटरने दखल घेत त्यांनी आरोपीला इशारा देत तो व्हिडीओ तातडीने हटवण्यास सांगितले. मात्र, आरोपीने ट्विटरच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर ट्विटरने हे व्हिडीओ ट्वीट ब्लॉक केलं.”
हेही वाचा : अर्थसंकल्पावरून सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र; म्हणाल्या, “यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे…”
या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत, अशीही माहिती राजस्थान पोलिसांनी दिली.