सायकलवर ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन पश्चिम बंगालमधील जलपायगुरी शहरात गुरुवारी पाच जणांचा बळी गेला, तर अन्य सहा जण जखमी झाल़े  येथील सेंट पॉल शाळेपासून काही अंतरावरच असलेल्या लहानशा पुलावरून सायकल पुढे जात असताना हा स्फोट झाला, अशी माहिती उत्तर बंगालचे पोलीस महानिरीक्षक शशिकांत पुजारा यांनी दिली़
ही घटना बाज्रापाडा भागात सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली़  हा अतिरेकी हल्ला आहे की, सायकलवरून स्फोटके घेऊन जात असताना त्यांचा अपघाताने स्फोट झाला, याचा तपास सुरू आहे, असेही पुजारा यांनी सांगितल़े  सायकलस्वाराचा मृतांमध्ये समावेश असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े

Story img Loader