Death of IRS officer and Family : केरळमध्ये एक आयआरएस अधिकाऱ्यासह त्याची आई आणि बहीण यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. घटनेच्या प्राथमिक तपासानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोची येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानात हे तिघे मृतावस्थेत आढळलेले होते. दरम्यान त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनीष विजय (४४) आणि त्यांची बहीण शालिनी विजय (४९) यांचे मृतदेह गुरुवारी कोची शहर पोलिस हद्दीतील आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानात आढळून आले होते. या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तर शकुंतला अग्रवाल (७७) यांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत एका पलंगावर, पांढऱ्या कापडाने झाकलेला आणि त्यावर फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

मनिष यांच्या आत्महत्येबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांची इतर भावंडे दुबईहून कोची येथे दाखल झाली, यानंतर मृतदेहांचे शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले, अशी माहिती कोचीचे सहायक पोलीस आयुक्त पी. व्ही बेबी यांनी दिली आहे. तसेच या आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान हे कुटुंब झारखंडमधील रांची येथील होते. त्यामुळे कोची पोलिसांकडून आता झारखंडमध्ये देखील तपास केला जाईल.

पोलिसांनी काय सांगितलं?

“आईच्या मृत्यूनंतर चार ते पाच तासांनी मुलगा आणि मुलीने गळफास लावून घेतल्याचे दिसून येते. असं वाटतं की, आईचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह खाली घेतला गेला, नंतर तो कापडात गुंडाळला आणि त्यावर फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या. आईच्या आत्महत्येनंतर त्यांनी काही विधी केलेले असू शकतात,” असेही बेबी म्हणाली . मनीषच्या बहिणीला त्यांनी आत्महत्या का केली असेल याबद्दल काहीही माहिती नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

आत्महत्येचं कारण काय असू शकतं?

२००६ मध्ये झालेल्या झारखंड पीएससी परीक्षेत शालिनीने पहिला क्रमांक मिळवला होता. पण या परीक्षेत कथित गैरव्यवहार झाल्यामुळे २०१३ मध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली. या प्रकरणात शालिनीला आरोपी म्हणून हजर करण्यात आले. तसेच या महिन्यात तिला सुनावणीला हजर राहण्यासाठी वॉरंटही जारी करण्यात आले होतेय . तर दुसरीकडे मनीष हे २०११ बॅचचे आयआरएस अधिकारी होते. अविवाहित असलेल्या दोन्ही भावंडांनी लहानपणीच त्यांच्या वडि‍लांना गमावले. त्यानंतर प्राध्यापक असणाऱ्या त्यांच्या आईने त्यांचे संगोपन केले होते.

पोलिसांना संशय आहे की, शालिनीसाठी १३ फेब्रुवारी रोजी वॉरंट जारी झाल्यानंतर तिघांनी आत्महत्या केली. “जर आम्हाला आत्महत्येच्या मागे दुसरे कुठले कारण आढळले नाही, तर आम्हाला या प्रलंबित प्रकरणाचा आत्महत्येच्या कारणीशी संबंध जोडावा लागेल,” असे पोलीसांनी सांगितले.

दरम्यान मनीष यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी सांगितले की तो साधा आणि प्रामाणिक अधिकारी होता. तसेच तो त्याच्या कुटुंबाशी खूप जोडलेला होता. “तो खूप धार्मिक होता आणि घरी पूजा करत असे. तो कुटुंबाशी, विशेषतः आईशी खूप जोडलेला होता,” असेही एका माजी सहकाऱ्याने सांगितले.