आसामच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दिमा हसाओ जिल्ह्य़ात शनिवारी सकाळी सशस्त्र अतिरेक्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस ठार झाला. हाफलाँग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लुनखूक गावात दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी मोटारसायकलवरून आलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढविला त्यामध्ये लुहितनाथ हा पोलीस कर्मचारी ठार झाला.या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. अतिरेक्यांच्या हल्ल्यात लुहितनाथ हा जागीच ठार झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सदर हल्ला कोणत्या अतिरेकी संघटनेने केला त्याची निश्चिती झालेली नाही. दिमा हसाओ जिल्ह्य़ात २१ नोव्हेंबर रोजी सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचा एक जवान ठार झाला तर अन्य सहा जण जखमी झाले होते.     

Story img Loader