Delhi Police officer kicks men offering Namaz Video: दिल्लीतील इंद्रलोक येथील एका रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एका मशिदीबाहेर नमाज अदा करणाऱ्या जमावाला दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाने लाथ मारून हटवल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला होता. यानंतर या पोलिस उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. उत्तर दिल्लीतील इंद्रलोक पोलिस चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक मनोज कुमार तोमर (३५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि निदर्शने झाली होती ज्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली.

या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तोमर हे नमाज अदा करणाऱ्या काही पुरुषांना लाथ मारताना आणि ढकलताना दिसत आहे. तर व्हिडिओ क्लिपमध्ये अन्य दोन पोलीस तोमर यांच्या मागे फिरताना दिसतायत जे या जमावाला आपली चटई उचलून तिथून निघून जाण्यासाठी ओरडत आहेत. नमाज पठण सुरू झाल्यानंतर १० मिनिटांनी तोमर यांनी या गर्दीतील काहींना लाथ मारली आणि घटनास्थळ सोडून जाण्यासाठी सांगितले, हा प्रकार उपस्थितांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून मग हा व्हिडीओ व्हायरल केला.

Kalyan citizens beat youths who molested a girl
कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
police detained criminal and beat him on street who threatened to beat journalists
Video : डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी

नमाजासाठी जमलेल्या लोकांचे म्हणणे काय?

नमाज अदा करणाऱ्यांपैकी काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नमाजासाठी जमा झालेली ही गर्दी मशिदीपासून बाहेरच्या रस्त्यावर पसरली होती, परंतु वाहतुकीला अडथळा होत नव्हता.

सदर घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने (नाव उघड न करण्याच्या अटीवर) इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “आम्ही रस्ता अडवत नव्हतो. नमाज पठण करण्यासाठी मशिदीच्या बाजूला फक्त एक अरुंद मार्ग वापरला जात होता आणि वाहतूक दर शुक्रवारी सुरळीत चालू होती. घटना घडली तेव्हा आम्ही आमची चटई पसरून नमाज पठण करण्यासाठी बसलो होतो. पोलीस कर्मचारी मागून आमच्या जवळ आले आणि आम्हाला जबरदस्ती करून निघून जाण्यास सांगत होते, दर शुक्रवारी आम्ही नमाज अदा करतो तेव्हा जवळच्या पोलिस चौकीतून या ठिकाणी पोलिसांना तैनात केले जाते, पण असे पहिल्यांदाच घडले आहे.”

पोलिसांनी काय दिलं उत्तर?

दरम्यान, या घटनेनंतर तोमर यांच्यावर कारवाईची मागणी करत पोलिस चौकीबाहेर जमाव गोळा झाला होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डीसीपी-स्तरीय आणि संयुक्त सीपी-स्तरीय अधिकाऱ्यांसह दंगल-नियंत्रण वाहने आणि निमलष्करी दलांसह परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली होती.

जमावाला उत्तर देताना पोलिस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी सांगितले की, “तोमर मागील दोन महिन्यांपासून इंद्रलोक चौकीत तैनात होते. कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नसली तरी पोलीस उपनिरीक्षक तोमर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. त्यांच्या विरोधात यापूर्वी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत का ते तपासले जाईल. सध्या व्हिडिओच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल.”

हे ही वाचा<< कुख्यात गुंड व लेडी डॉनच्या सोहळ्यात २०० पोलिसांची फौज देणार सुरक्षा; जय्यत तयारी सुरु, पाहा कुठं सजणार मंडप?

तर डीसीपी, ईशान्य दिल्ली, जॉय टिर्की यांनी ‘एक्स’ वर सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना जनतेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र इंद्रलोक येथील घटनेचा आम्ही निषेध करतो. या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांनी सामाजिक सौहार्द राखावे आणि अफवांवर लक्ष देऊ नये.”

नागरिकांचं म्हणणं काय?

दुसरीकडे सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ईशान्य दिल्ली भागातील जनतेने मात्र पोलिसांची बाजू घेतली आहे. इतक्या मशिदी असताना रस्त्यावर उतरण्याची आवश्यकताच काय होती असेही प्रश्न केले जात आहेत. तर काहींनी यावर पोस्ट करताना पोलिसांनी त्यांना जाण्यासाठी सांगणे हे चुकीचे नसले तरी लाथ मारायची गरज नव्हती असेही मत व्यक्त केले आहे.

Story img Loader