Drugs Seized in Gujarat : दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने गुजरात पोलिसांसह संयुक्त कारवाईत रविवारी गुजरातच्या अंकलेश्वरमध्ये एका ड्रग्जशी संबंधित कंपनीच्या झडतीदरम्यान ५१८ किलो कोकेन जप्त केले. या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५ हजार कोटी रुपये आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तस्करीच्या रॅकेटमध्ये गुजरातस्थित अंकलेश्वर फार्मास्युटिकल कंपनीची भूमिका निश्चित करण्यासाठी फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केली जात आहे, असे या प्रकरणातील घडामोडींची माहिती असलेल्या तपासकर्त्यांनी सांगितले. हा औषधे आधी गोव्यात आली, तेथून त्याच्या शुद्धीकरणासाठी गुजरातमध्ये आणली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या औषधांवर प्रक्रिया झाल्यानंतर ते दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पाठवली जातात. तिथून त्याची विक्री केली जाते.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

हेही वाचा >> Cocain Seized in Delhi : स्नॅक्सच्या पाकिटातून अंमली पदार्थांची तस्करी, पोलिसांनी जप्त केला २ हजार कोटींचा माल!

रविवारचा जप्ती हा गेल्या १५ दिवसांतील तिसरा छापा होता. या छाप्यामुळे एकूण १ २८८ किलो कोकेनचा जप्त करण्यात आला आहे. पहिला छापा १ ऑक्टोबर रोजी महिपालपूर येथे झाला होता, जिथे ५६२ किलो कोकेन पकडण्यात आले होते, तर १० ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांनी २०८ किलो कोकेन जप्त केले होते. दिल्लीत रमेश नगरमध्ये स्नॅक्सच्या पॅकेटात हे ड्रग्स लपवण्यात आले होते.

विशेष सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करताना गेल्या दोन आठवड्यांत किमान सात जणांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी स्नॅक्सच्या पाकिटात आढळले होते ड्रग्स

दिल्लीतील सर्वात मोठ्या कोकेन जप्तीच्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की आरोपींनी दुबईहून गोव्यात जुन्या मालवाहू जहाजांमधून कोकेन आणले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डीसीपी (सेल) अमित कौशिक यांच्या पथकाने १ ऑक्टोबर रोजी महिपालपूरमध्ये व्यापारी तुषार गोयल, त्याचे दोन साथीदार आणि एका रिसीव्हरला ५६२ किलो कोकेनसह अटक केली होती.