Yogendra Yadav On Congress: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २३९ जागा तर एनडीएला मिळून २९२ जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षाला ९९ जागा मिळवण्यास यश आलं. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. तर काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. मात्र, भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा दिला होता. पण एनडीएला केवळ २९२ तर भाजपाला २३९ जागा जिंकता आल्यामुळे भाजपाचं ‘४०० पार’चं स्वप्न भंगलं. मात्र, काँग्रेस पक्षाला ९९ जागा कशा मिळाल्या? आणि काँग्रेस पक्षाचं पुढचं भवितव्य कशावर अवलंबून असेल? याबाबत आता ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या कार्यक्रमात मोठं भाष्य केलं आहे. “लोकसभा निवडणुकीत ९९ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा राहुल गांधी किती घेतात, यावर काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असेल. तसेच काँग्रेसला पक्षाची नव्याने बांधणी करावी लागेल”, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

योगेंद्र यादव काय म्हणाले?

“मला वाटतं की काँग्रेस (Congress) पक्षाला आणि खासदार राहुल गांधी यांना भविष्यात चांगली संधी आहे. यावेळी काँग्रेस पक्षाला चांगली संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या, म्हणजे काँग्रेस सध्या नाबाद ९९ धावांवर आहे. त्यामुळे काँग्रेसला आपली पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी संधी मिळालेली आहे. काँग्रेसला पक्ष संघटना अधिक ताकदवान करायला लागेल. माझ्या मते राहुल गांधी यांच्यासाठी देखील ही एक मोठी संधी आहे”, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”
Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule : शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “जोपर्यंत…”
sharad pawar
जातीय जनगणना, आरक्षण मर्यादेवर शरद पवार थेटच बोलले, “मागील तीन वर्षांपासून ..”

हेही वाचा : RSS शी संबंधित ‘पांचजन्य’मधून जातीव्यवस्थेचं समर्थन; थेट अग्रलेखातून मांडली सविस्तर भूमिका!

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त ६० जागाच निवडून आल्या असत्या तर सर्वजण म्हणाले असते की ‘भारत जोडो यात्रा’ काढली, पण त्याचा काय फायदा झाला? मग काय न्याय देण्याची गोष्ट करता? हिंदुत्वाचा प्रचार करूनच मत मिळतात, असे अनेक सल्लेही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिले गेले असते. मात्र, ९९ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे या संधीचा राहुल गांधी किती फायदा उठवितात यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. हीच काँग्रेससाठी मोठी संधी असेल. काँग्रेस याचा किती फायदा करेल हे देखील त्यांच्यावर अवलंबून असेल. त्यासाठी काँग्रेसला पक्षाची नव्याने बांधणी करावी लागेल. यामध्ये पक्ष संघटना वाढवायला लागेल”, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.